Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २८ मे, २०२५

१०० टक्के अनुदानावर सोयाबीन व भुईमूग बियाणे – शेतकऱ्यांनी अर्ज करावा : तालुका कृषी अधिकारी.साक्री



साक्री (प्रतिनिधी) – खरीप हंगाम २०२५ साठी शेतकऱ्यांना अनुदानित बियाण्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत साक्री तालुक्यातील वैयक्तिक शेतकऱ्यांना सोयाबीन व भुईमूग पिकांसाठी १०० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्यास १ हेक्टरपर्यंतचा लाभ दिला जाणार आहे.
अर्ज करताना फार्मर आयडी आवश्यक असून, अधिकृत वितरकांमार्फत महाबीज व राष्ट्रीय बीज निगम या संस्था बियाणांचा पुरवठा करतील.
इतर पिकांसाठी अनुदान: तूर, मूग, उडीद व बाजरी या पिकांच्या सुधारित वाणांसाठीही अनुदान उपलब्ध आहे.
१० वर्षांखालील वाण: तूर, मूग, उडीद – ₹५०/किलो, बाजरी – ₹३०/किलो
१० वर्षांवरील वाण: सर्व पिकांसाठी ₹२५/किलो या घटकासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही.
शेतकरी गटांसाठी विशेष योजना: शेतकरी गट, उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांना प्रात्यक्षिकासाठी १००% अनुदान दिले जाणार आहे.
गटाने ३१ मार्च २०२४ पूर्वी नोंदणी केलेली असावी.
१० हेक्टरपर्यंत प्रात्यक्षिकाची संधी.
गटात किमान ३०% महिला, १२% अनुसूचित जाती, ९% अनुसूचित जमाती व ७९% सर्वसाधारण प्रवर्गाचे सदस्य असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांसाठी आवाहन: "राज्य शासनाच्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. साक्री तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर लवकरात लवकर अर्ज करावा," असे आवाहन श्री.योगेश दिगंबर सोनवणे तालुका कृषी अधिकारी, साक्री यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध