Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २५ जून, २०२५

शिंदखेडा शहरालगत असलेल्या हॉटेल्स न्यू वाईन कॉर्नर ला अखेर नियमभंग 40 हजार रु दंड

माहिती अधिकार कार्यकर्ते धनराज निकम यांच्या तक्रारीवरून 


शिंदखेडा :- ( पाटण ) शिंदखेडा तालुक्यातील पाटण शिवारातील हॉटेल्स न्यू वाईन कॉर्नर, एफ एल -3 क्र 331 विषयी माहिती अधिकार कार्यकर्ते धनराज निकम यांनी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क. भरारी पथक धुळे यांनी सदर हॉटेल्स ची सखोल तपासणी केली होती. त्यात विना परिवहन पास डि एस पी ब्लॅक 180 मिली च्या 28 बाटल्या मिळून आल्या होत्या. तसेच ग्राहकांना विना मद्यसेवन परवाना मद्याची विक्री सुद्धा आढळून आलेली होती. त्यानुसार संबंधित हॉटेल्सचे मालक श्री मनीष सुरेश शहदादपुरी यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली होती. त्यात नियम उ्लंघनाबाबत महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कलम 54 (1) क अंतर्गत परवाना रद्द का करण्यात येऊ नये? याबाबतीत लेखी खुलासा मागितला होता. तसेच परवाना वर नियमभंग / विसंगती चा गुन्हा देखील दाखल झाला होता. 
           
त्या अनुषंगाने हॉटेल्स न्यू वाईन कॉर्नर चे मालक मनीष शहदादपुरी यांनी खुलासा सादर करून परवाना मध्ये झालेले नियमभंग मान्य केले होते. व प्रकरण सामोपचाराने मिटविण्याची विनंती केली होती. 
         
वरील प्रकरणी मा जिल्हाधिकारी, धुळे यांनी श्री. मनीष सुरेश शहदादपुरी, हॉटेल्स न्यू वाईन कॉर्नर एफ एल 3 क्र 331 यांना नियमभंग प्रकरणी तडजोड तडजोड शुल्क रु 40000/- मात्र ( चाळीस हजार मात्र ) इतका दंड केला आहे. विहित मुदतीत दंडाची रक्कम न भरल्यास व्याजासह तडजोड शुल्क भरेपर्यंत परवाना निलंबित करण्यात येईल. असे देखील आदेशात म्हटले आहे. 

सदर हॉटेल्स विना पास परवाना विदेशी दारू विक्री, तसेच विना परवाना मद्याची विक्री तर होतेच. परंतु बनावट नकली विदेशी दारू विक्री तसेच किचन वैगरे मुद्द्यावर अर्थपूर्ण रित्या कार्यवाही केलेली नसून मुळ तक्रारी वर मुद्दे निहाय चौकशी केलेली नाही. विदेशी दारू चे सॅम्पल घेण्यात आलेले नाहीत. अश्या कितीतरी मुद्दे आजदेखील जिवंत आहेत. म्हणून संबंधित व्यक्तीचा परवाना कायमस्वरूपी बंद करण्यात यावा. इतरत्र होत असलेली बनावट नकली दारू विक्रेत्यांवर देखील कारवाई व्हावी.
 :- धनराज व्ही. निकम  
माहिती अधिकार कार्यकर्ता


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध