Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २५ जून, २०२५
Home
/
Unlabelled
/
सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आराध्या महाजन राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक राखून मेरिट मध्ये उत्तीर्ण
सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आराध्या महाजन राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक राखून मेरिट मध्ये उत्तीर्ण
प्रतिनिधी :- एरंडोल तालुका सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप, कालिकत केरळ द्वारे आयोजित सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप स्कीम अंतर्गत 2024/25 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये एरंडोल येथील न्यू इंग्लिश मेडियम स्कूलची विद्यार्थिनी कु.आराध्या कृष्णा महाजन राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक राखून मेरिटमध्ये उत्तीर्ण झाली आहे. त्याबद्दल तिला मेरीट मध्ये आल्याबद्दल प्रमाणपत्र व गोल्ड मेडल, रोख रक्कम असे मिळाले.तिच्या या घवघवीत यशाबद्दल शाळेचे प्रिन्सिपल हॅरी जॉन,व्हाइस प्रिन्सिपल सरला मॅडम, वर्गशिक्षक अश्विनी मॅडम,तिचे आई,वडील,आजी,आजोबा, काका, मामी,मामा यांनी तिचे अभिनंदन केले.आराध्या ही विखरणयेथील रहिवासी कृष्णा अरुण महाजन व सौ.देवयानी महाजन यांची मुलगी तर सामाजिक कार्यकर्ते कै. अरुण ओंकार खुणेपिंप्रे यांची नात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा