Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ जून, २०२५
जिल्हा परिषद आदर्श शाळा मुडावद येथे शाळा शुभारंभ उत्साहात साजरा
नवागत विद्यार्थ्यांचे मिरवणुकीने स्वागत
बेटावद शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथील
जिल्हा परिषद आदर्श शाळा, मुडावद येथे आज शाळा शुभारंभ दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. या उपक्रमांमुळे संपूर्ण गावात आनंदमय वातावरण निर्माण झाले होते.
शाळेचा प्रारंभ इयत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या वाजतगाजत मिरवणुकीने करण्यात आला. चारचाकी वाहनातून या लहानग्यांना गावातून मिरवण्यात आले. या मिरवणुकीत शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर शाळेच्या प्रांगणात नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच सौ. भारती सुरेंद्र चौधरी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुनील सोनार, सदस्य व अनेक पालक वर्ग उपस्थित होते. केंद्रप्रमुख गजेंद्र साळी यांनी शाळेला भेट दिली व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, मोजे व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळा शुभारंभाच्या निमित्ताने संपूर्ण शाळा फुगे, पताका व सजावटीच्या वस्तूंनी आकर्षकपणे सजवण्यात आली होती. नवागत विद्यार्थ्यांची सेल्फी घेण्यात आली, तसेच त्यांच्या पावलांचे ठसे घेऊन ‘शाळेतील पहिले पाऊल’ म्हणून ते क्षण लक्षात राहतील अशी संकल्पना राबवण्यात आली.
मध्यान्ह भोजनात सर्व विद्यार्थ्यांना जलेबीचा विशेष मेनू देण्यात आला, ज्यामुळे लहानग्यांच्या आनंदाला उधाण आले होते.
मुख्याध्यापक श्री. हिंमत राव माळी यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत नवशैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन नरेंद्र थोरात यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक श्री. शिवाजी महाजन, शितल भामरे व दुर्गा सुरडकर मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. ह्या कार्यक्रमामुळे शाळा आणि गाव यांच्यातील नात्याला घट्ट करणारा ठरला असून, विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आत्मीयता निर्माण करण्यास उपयुक्त ठरला.
ग्रामस्थांनी सुद्धा या उपक्रमाचे कौतुक केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला आज मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक हेमंत पाटी...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा