Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १० जून, २०२५
बेटावद येथे शिव राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
बेटावद, ता. शिंदखेडा
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार, बेटावद यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उत्सव गावातील बाजारपेठेतील वर्धमान फर्टीलायझरजवळ अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. ग्रामस्थांनी शिवाजी महाराजांच्या नावाने जयघोषात सहभागी होत महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. गावातील नागरिक, युवा वर्ग, आणि ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या राष्ट्रनायकाबद्दल अभिमान व्यक्त करत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मनोगत श्री. हिम्मतराव माळी सर यांनी अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी शैलीत सादर केले. त्यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्व, त्यांची दूरदृष्टी, धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था आणि सामान्य जनतेसाठी झगडणारा राजा म्हणून दिलेले योगदान प्रभावीपणे मांडले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर तालुक्यातील करवंद गावालगत असलेल्या सनस्टार कंपनीतून सातत्याने येणाऱ्या तीव्र व दुर्गंधीयुक्त वासामुळे परिसरातील ना...
-
शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुक्याच्या विकासात्मक कार्याचे तेजस्वी नेतृत्व करणारे सन्माननीय भाईसाहेब अमरीशजी पटेल व सन्माननीय भूपेशभाई पटेल, ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा