Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २७ जून, २०२५
बेटावद परिसरात पावसाची जोरदार हजेरी; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
बेटिवद प्रतिनिधी:- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावात मागील दोन दिवसांपासून हलकासा रिमझिम पाऊस पडत होता.मात्र,आज शुक्रवार दि.२७ जून रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. यामुळे बाजारपेठेत काहीसा गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
शुक्रवार हा बेटावदचा आठवडे बाजार असल्यामुळे गावात आठवडे बाजाराच्या ठिकाणी भाजीपाला, किराणा, कपडे व इतर दुकानांची मांडणी सुरू होती. अचानक आलेल्या पावसामुळे विक्रेत्यांची तारांबळ उडाली. काही दुकाने झाकण्यासाठी धावपळ झाली, तर काही ठिकाणी ग्राहकांची गर्दीही ओसरली. या वर्षी बेटावद परिसरातशेतकऱ्यांनी मका लागवडी वर जास्त भर दिला आहे.
पावसामुळे मात्र शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या वर्षीचा आतापर्यंतचा सर्वात चांगला पाऊस आज पडल्याने मका व इतर खरीप पिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी मका लागवड सुरू केली असून काहींची पेरणी अद्याप सुरू व्हायची आहे. तर काही ठिकाणी शेतात मशागत व आंतरमशागत सुरू आहे.
पावसामुळे शेतमजुरांनाही कामाची संधी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी व मजूर वर्गात समाधानाचे वातावरण असून बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा