Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ जून, २०२५
Home
/
Unlabelled
/
पिंपरी-चिंचवडच्या कुख्यात गुन्हेगारांना चोपडा शहर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत केली अटक
पिंपरी-चिंचवडच्या कुख्यात गुन्हेगारांना चोपडा शहर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत केली अटक
चोपडा प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील तीन कुख्यात आणि सराईत गुन्हेगारांना चोपडा शहर पोलिसांनी काल रात्री दरोड्याची पूर्वतयारी करत असताना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे १०.८१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामुळे चोपड्यात होणारा एक मोठा दरोड्याचा कट उधळला गेला आहे.
पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, चोपडा शहर पोलिसांनी काल रात्री १०:४५ वाजताच्या सुमारास मामलदे शिवारात, चोपडा-चुंचाळे रोडवरील एका निर्जनस्थळी थांबलेल्या एम.एच.१४ ए एस ७९०५ क्रमांकाच्या मोटर कारचा शोध घेतला. या गाडीत एकूण ६ संशयित इसम होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडून लोखंडी टॉमी, मिरची पूड आणि दोर असे घरफोडी व जबरी चोरीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले.
या इसमांचा उद्देश काहीतरी गंभीर गुन्हेगारी कृत्य करण्याचा असल्याचे संशय बळावल्याने, पोलिसांनी त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. यापैकी तीन इसमांवर पुणे येथील पिंपरी-चिंचवड आणि निगडी पोलीस ठाण्यांमध्ये खून, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, दंगल आणि आर्म ॲक्टसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
पिंपरी-चिंचवड पोलिसांशी संपर्क साधला असता, हे इसम कुख्यात आणि अत्यंत धोकादायक गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली.सखोल चौकशीअंती हे इसम दरोड्याच्या तयारीनेच चोपड्यात थांबले होते हे स्पष्ट झाले.
पोलिसांनी तातडीने त्यांची मोटर कार, मोबाईल फोन, रोख रक्कम, लोखंडी टॉमी, मिरची पूड आणि दोर असा एकूण १०,८१,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
अटक करण्यात आलेल्या सहा इसमांपैकी तीन अल्पवयीन असल्याने त्यांना जळगाव येथील बालन्यायमंडळाकडे पाठवण्यात आले आहे. उर्वरित तीन आरोपींमध्ये तुषार उर्फ तुषल्या गौतम झेंडे (वय २५, रा. उर्वल सोसायटी, निगडी, पिंपरी-चिंचवड, पुणे), विनोद राकेश पवार (वय २५, रा. दत्तनगर, चिंचवड, पुणे) आणि सुनील गोरख जाधव (वय ३०, रा. दत्तनगर, चिंचवड, पुणे) यांचा समावेश आहे. या तिघांना दि. २६ जून रोजी चोपडा न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. २९ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या आरोपींपैकी विनोद राकेश पवार याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात खून, घरफोडी, दरोडा, जबरी चोरी, आर्म ॲक्ट आणि दंगल असे १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. तुषार गौतम झेंडे याच्यावर निगडी आणि पिंपरी पोलीस ठाण्यांमध्ये खून, घरफोडी, दरोडा, जबरी चोरी आणि आर्म ॲक्ट असे ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत.सुनील गोरख जाधव याच्यावर तर दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत.
चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि अंमलदार यांच्या सतर्कतेमुळे आणि योग्य कामगिरीमुळे दरोड्यासारखा एक गंभीर गुन्हा करण्याचा या टोळीचा कट उधळण्यात यश आले आहे.
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक,कविता नेरकर यांच्या व उपविभागीय पोलीस अधिकारी,अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे,सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे,सफौ दीपक विसावे,जितेंद्र सोनवणे,पोहेकॉ संतोष पारधी,ज्ञानेश्वर जवागे,लक्ष्मण शिगाणे,हर्षल पाटील,महेंद्र साळुंके, पोना संदीप भोई,पोकॉ विनोद पाटील,निलेश वाघ,प्रकाश मथुरे,प्रमोद पवार आणि गजेंद्र ठाकूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा