Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २४ जून, २०२५

जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार



उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांचे आदेश

       अमळनेर : शहरातील अट्टल गुन्हेगाराला उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी तीन  जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. तर चोपडा तालुक्यातील पिंप्री येथील एकाला पाच तालुक्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार केले आहे.*



        अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील दर्गाअली भागातील मोज्जम शेख शब्बीर याच्यावर चोरी ,घरफोडी , मालमत्ता नुकसान ,मारहाण ,एनडीपीएस यासारखे सहा गुन्हे दाखल असून शहरात दहशत माजवतो त्याच्या पासून जनतेची भीती असल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मोज्जम विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून डीवायएसपी विनायक कोते यांच्याकडे पाठवला. डीवायएसपी कोते यांनी चौकशी करून  अहवाल  उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्याकडे पाठवला. त्यावर सुनावणी घेऊन उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६(१)(अ)(ब) प्रमाणे मोज्जम याला जळगाव ,धुळे ,नंदुरबार जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. तो जेथे राहील तेथे त्याने नजीकच्या पोलीस स्टेशनला हजेरी लावणे बंधनकारक असेल. 
      

  त्याच प्रमाणे चोपडा तालुक्यातील अडावद पोलीस स्टेशन अंतर्गत पिंप्री येथील संजय रवींद्र इंगळे याच्यावर देखील विनयभंग ,मारहाण ,दादागिरी असे चार पाच गुन्हे दाखल असून त्याच्यापासून देखील जनतेला भीती वाटत असल्याने अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी त्याचा हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर सुनावणी होऊन उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी संजय इंगळे चोपडा ,यावल , रावेर , धरणगाव , अमळनेर या पाच तालुक्यातून तीन महिन्यांकरिता हद्दपार केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध