Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २३ जून, २०२५
Home
/
Unlabelled
/
कल्याण पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक 5 गौरीपाडा मधील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या भूमिपूजन सोहळा संपन्न...!
कल्याण पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक 5 गौरीपाडा मधील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या भूमिपूजन सोहळा संपन्न...!
राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी आमदार नरेंद्र पवार आणि युवासेना जिल्हा चिटणीस वैभव विश्वनाथ भोईर यांची प्रमुख उपस्थिती*
कल्याण दि.23 जून : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 5 मधील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा रविवारी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी आमदार नरेंद्र पवार आणि युवासेना जिल्हा चिटणीस वैभव विश्वनाथ भोईर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कल्याण पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक 5 गौरीपाडा येथील वृंदावन रेसिडेन्सी ते साई चौक योगीधाम पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून 50 लाख आणि विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून 1 कोटी रुपयांचा विकासनिधी यासाठी प्राप्त झाला आहे.
या संयुक्त निधीच्या माध्यमातून याठिकाणी आता सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम केलं जाणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यात राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी आमदार नरेंद्र पवार, युवासेना जिल्हा चिटणीस वैभव विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
तर यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी दया गायकवाड यांच्या प्रभागातील कामाची स्तुती केली. तसेच कोविड काळामध्ये त्यांनी केलेल्या कामाचीही यावेळी विशेष आठवण करून देत कौतुकाची थाप दिली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाला भाजपा 138 विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे, भगवान म्हात्रे, श्याम मिरकुटे, नरेंद्र सिंग, पप्पू मिश्रा यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा