Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २३ जून, २०२५
बेटावदमध्ये SBI एटीएम सेवा ठप्प – नागरिकांचे हाल
बेटावद प्रतिनिधी (ता. शिंदखेडा) – गावातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चा एकमेव एटीएम मशीन गेले एक महिना पासून पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. परिणामी, स्थानिक नागरिकांना रोज चे आर्थिक व्यवहार, रोख रक्कम काढणे, पेन्शन काढणे यासाठी प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
विशेष म्हणजे, गावात SBI व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या बँकेचे एटीएम केंद्र उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या संपूर्ण गाव एटीएमविना अडकलं आहे. रोख रक्कमेसाठी नागरिकांना नरडाणा सारख्या ठिकाणी जावे लागत आहे
त्याचप्रमाणे गावात असलेले SBI चे एकमेव ग्राहक सेवा केंद्र (CSP) सुद्धा नेहमीच कनेक्टिव्हिटीच्या समस्येमुळे बंद असते. केंद्रावर ‘तांत्रिक कारणास्तव सेवा बंद’ असा फलक कायम झळकत असतो, त्यामुळे तेथून देखील कोणतीही सेवा मिळत नाही.
ग्रामस्थांची मागणी
ग्रामस्थांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देत, SBI बँकेच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर एटीएम सुरु करावे, CSP केंद्राची तांत्रिक अडचण दूर करावी आणि भविष्यात अशा अडचणी येऊ नयेत यासाठी बेटावदमध्ये दुसऱ्या बँकांचे एटीएम देखील सुरू करावेत, अशी मागणी ग्रामस्थानी केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा