Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ५ जुलै, २०२५

सरपंचपदाचे आरक्षण सोडत दिनांक 8 जुलै रोजी काढण्यात येणार



अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील 119 ग्रामपंचायतीच्या 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण सोडत दिनांक 8 जुलै रोजी काढण्यात येणार आहे. नगर परिषद सभागृह, नगर परिषद कार्यालय अमळनेर येथे दुपारी 2 वाजता ही सोडत निघेल. या सोडतीत अनुसूचित जातीसाठी 6 अनुजाती महिला साठी 3, अनुसूचित जमातीसाठी 14,अनु जमाती महिलां साठी 7,नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी 32, ना.मा.प्र महिलां साठी 16, खुल्या प्रवर्गातील सर्वसा धारणसाठी 67 तर सर्वसाधारण महिलांसाठी 34 याप्रमाणे सरपंच आरक्षण काढण्यात येणार आहे. सदर सोडतीकडे संपूर्ण अमळनेर तालुक्यातील 119 गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. आरक्षण सोडतीस ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध