Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३ जुलै, २०२५

नरडाणा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ; वाहन बॅटरी चोरास अटक, ३.४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत



नरडाणा पोलीस ठाण्याच्या कारवाईत वाहनांच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास अटक करून तब्बल २७ बॅटऱ्या आणि चोरीची अ‍ॅक्टीवा स्कुटी असा एकूण ३,४०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दिनांक १ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ते २ जुलै २०२५ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास फिर्यादी दिलीप राजाराम माळी (वय ५२, रा. नवा प्लॉट, बेटावद) यांच्या मिनी ट्रक मधून २५,०००/- रुपयांच्या बॅटऱ्या चोरी झाल्याची फिर्याद नरडाणा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर ११०/२०२५ अंतर्गत भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

सपोनि निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकाऱ्यांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. यावेळी नरडाणा ते बेटावद मार्गावर एक संशयित इसम अ‍ॅक्टीवा स्कुटीवर दोन बॅटऱ्या घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तत्काळ सापळा रचून दादाभाई बाळु पाटील (वय ३८, रा. कार्ली, जि. नंदुरबार) या इसमास पकडण्यात आले. चौकशीत त्याने दोडांईचा येथून स्कुटी चोरी केल्याची तसेच नरडाणा, बेटावद, शिंदखेडा व दोडांईचा परिसरातून वाहनांच्या बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली.

त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून
🔹 २७ अ‍ॅमरॉन व एक्साईड कंपनीच्या बॅटऱ्या (किंमत ३,००,०००/-)
🔹 चोरीची अ‍ॅक्टीवा स्कुटी क्रमांक MH 18 BN 0189 (किंमत ४०,०००/-)
🔹 बॅटरी उघडण्यासाठी वापरली जाणारी पानं
🔹 कार्बन कंपनीचा मोबाईल फोन
असा एकूण ३,४०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

आरोपीने मिळालेल्या रकमेवर पत्ते व जुगार खेळून मौजमजा करत असल्याचे उघड झाले आहे. त्यास अटक करून न्यायालयात हजर केले असता १ दिवस पोलीस कोठडी मंजूर झाली असून पुढील तपास पो.ना. भुरा पाटील करीत आहेत.

ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पो.उ.नि.रविंद्र महाले, पोहेकॉ राकेश शिरसाठ, ललित पाटील, भरत चव्हाण, गणेश पाटील, रविंद्र मोराणीस, पो.ना.भुरा पाटील, विनोद कोळी, प्रशांत पाटील, अर्पण मोरे, सचिन बागुल, विजय माळी, सुनील पगारे, सुरज सावळे,भरत भगरे व अजय सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

नरडाणा पोलिसांच्या या तडफदार कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, परिसरात पुन्हा एकदा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध