Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ११ जुलै, २०२५
Home
/
Unlabelled
/
नांदेड ते घुमान व्हाया शिमला – महाराष्ट्र व पंजाबमधील सांस्कृतिक ऋणानुबंध जपणारी 'घुमान यात्रा' यंदाची अकरावी यात्रा – २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर
नांदेड ते घुमान व्हाया शिमला – महाराष्ट्र व पंजाबमधील सांस्कृतिक ऋणानुबंध जपणारी 'घुमान यात्रा' यंदाची अकरावी यात्रा – २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर
नांदेड (प्रतिनिधी)– महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील ऐतिहासिक व आध्यात्मिक ऋणानुबंध अधिक बळकट करणारी 'संत नामदेव घुमान यात्रा' यंदा ११ व्या वर्षात पदार्पण करत आहे. नानक साई फाउंडेशनच्या वतीने आयोजित ही यात्रा २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत भव्यतेने संपन्न होणार आहे..
यात्रेचे प्रमुख उद्दिष्ट : संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार, महाराष्ट्र-पंजाबमधील बंधुत्व वृद्धिंगत करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणे.. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली येथील प्रसिद्ध धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन करणे यात्रेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये : संत नामदेव महाराजांची कर्मभूमी घुमान (पंजाब) येथे नतमस्तक होणे तसेच पंजाब- हिमाचल प्रदेश -दिल्ली -हरियाणा राज्यातील प्रमुख ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत.दिल्ली, शिमला,चंदिगड,
अमृतसर, भटिंडा, वाघा बॉर्डर,कुरुक्षेत्र, नैना देवी शक्तीपीठ, कार्तिक स्वामी, आनंदपुर साहिब,फत्तेगड साहिब, भाक्रा नांगल धरण,भद्रकाली माता मंदिर, पानिपत, जालियनवाला बाग, बस्सी पठाना,लव-कुश जन्मभूमी आणि श्री क्षेत्र घुमान या स्थळांचा यावर्षी च्या यात्रेत समावेश राहणार आहे. राष्ट्रभक्तीचा अनुभव,परिवारासह प्रवासासाठी योग्य,आध्यात्मिक व पर्यटनाचा संगम,पंजाबी मेहमाननवाजी व संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव देणारी कौटुंबिक सहलीत सहभागी होण्यासाठी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे (9823260073) यांनी केले आहे. भक्ती, संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि निसर्ग सौंदर्याचा संगम अनुभवण्यासाठी या वर्षीची ‘घुमान यात्रा’ नक्कीच आनंदवारी ठरणार आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावात वडार वाडा परिसरात अवैध गावठी दारू अड्ड्यावर नरडाणा पोलिसांनी सोमवारी सकाळी छापा टाकत मोठी कारवाई केली. या ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाडळसरे येथे तरुणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना ९ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अक...
-
धुळे प्रतिनिधी :- "शिक्षणाचे मंदिर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळेत प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या मुख्याध्यापिका आणि ...
-
अमळनेर (वाढदिवस विशेष) : नुकतेच पाडळसरे धरणास मिळालेली उच्चस्तरीय मंजुरी ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाची नांदी ठरली आहे. यामुळे सिं...
-
बेटावद प्रतिनिधी:- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे आषाढी एकादशीच्या शुभदिनी बेटावद येथील माळी वाडा परिसरातील विठ्ठल मंदिरात पारंपरिक भक्तिभ...
-
बेटावद प्रतिनिधी : दिनांक 5 जुलै 2025 रोजी रात्री 1:45 वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा ग्र...
-
नांदेड (प्रतिनिधी)– महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील ऐतिहासिक व आध्यात्मिक ऋणानुबंध अधिक बळकट करणारी 'संत नामदेव घुमान यात्रा' यंदा १...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
-
मानवाच्या ज्याप्रमाणे अन्न,वस्त्र व निवारा ह्या तीन मूलभूत गरजा आहेत,त्याचप्रमाणे शिक्षण सुद्धा चौथी मूलभूत गरज बनलेली असल्याने शेवटी जो शिक...
-
शिंदखेडा तालुक्यातील दहिवेल (ता. शिंदखेडा) येथे घडलेली एक घटना अपघात असल्याचे प्रथमदर्शनी भासवत असली, तरी नरडाणा पोलिसांनी तपासाचा धागा पकडत...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा