Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३१ जुलै, २०२५

साक्री तालुक्यातील शेणपूर गावातील जंगलात राहणाऱ्या आदिवासी बांधवाना वीज जोडणी करण्यासाठी महावितरण कंपनीला निवेदन देण्यात आले



साक्री तालुक्यातील शेणपूर गावालगत असलेल्या आदिवासी वसाहतीत विज वितरण कंपनीने विदयुत पुरवठा करुन लाईन उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनच्यावतीने निवेदन देऊन करण्यात आली.
शेणपूर गावापासुन एक किलोमीटर अंतरावर असलेली कराई वस्ती येथे गेल्या दहा ते बारा वर्षापासून दहा पंधरा आदिवासी कुटुंब वास्तव करत असून त्यांना अद्याप लाईट पासून वंचित रहावे लागत आहे.गेल्या वर्षी एका लहान मुलास साप चावला होता.त्यात तो नशिबाने वाचला असून त्या परिसरात साप तसेच बिबट्याचा रात्री,पहाटे सरास वावरत आहे. त्यामुळे वस्तीत राहणाऱ्या लोकानमध्ये भीतीचे वातावरण आहे.अनेक जंगली जनावरे म्हणजे वाघ बिबट्या देखील पहावयास मिळाले आहेत त्यामुळे वन्य प्राण्यापासून लहान बालके जेष्ठ नागरिक याच्यावर हल्ला होण्याची शक्यता नकरता येत नाही म्हणुन महावितरण कंपनी पिंपळनेर यांनी आदिवासी बांधवाना विद्युत लाईट जोडणी ची मागणी जोर धरत आहे यामुळे जंगलातील
आदिवासी वस्तीत लाईट नसल्या कारणाने शाळकरी मुलाना रात्री अभ्यास करण्यास मोठी अडचण निर्माण होते.त्यामुळे त्यांचे शालेय जिवनाचे मोठे नुकासान होत आहे.तरी त्या वस्तीसाठी स्वतंत्र लाईट व खांब उपलब्ध करून द्यावी अशी मागणीचे निवेदन पिंपळनेर महावितरण कार्यालयाचे अभियंता श्री.नवसारे यांना देण्यात आले.
यावेळी शेणपूर ग्रामपंचायतचे सरपंच निकिता आकाश काकुस्ते,सागर काकुस्ते सदस्य,भुऱ्या पवार सदस्य ,सुनील घरटे,चंदू सोनवणे,श्रीराम देसाई,रमेश गायकवाड,प्रकाश भिल आदींसह गावातील नागरिक निवेदन देते वेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध