Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३१ जुलै, २०२५
Home
/
Unlabelled
/
तहाडी येथे दानशुर कै.भलकार बाबा पुण्यतिथी निमित्त नविन शालेय समितीचे अध्यक्षपदी किरण अहिरे व उपाध्यक्ष सतीश सोनवणे यांची निवड
तहाडी येथे दानशुर कै.भलकार बाबा पुण्यतिथी निमित्त नविन शालेय समितीचे अध्यक्षपदी किरण अहिरे व उपाध्यक्ष सतीश सोनवणे यांची निवड
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले आणि निस्वार्थ सेवाभावाने काम करणारे किरण माधव अहीरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी सतीश सोनवणे यांची निवड झाली. या निवडीमुळे संपूर्ण गावात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले आहे.
ही कार्यकारिणी ग्रामगौरव असलेल्या दिवंगत कै. नथुजी सोमजी भलकार यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात घोषित करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुदामजी भलकार होते. त्यांचे वडील भलकार बाबा यांनी गावातील शिक्षणाची गंगा वाहण्यासाठी त-हाडी येथील मराठी शाळेसाठी एक एकर जागा दान दिली होती. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी ३१ जुलै रोजी शाळेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम साजरा केला जातो. यंदाच्या कार्यक्रमातच नव्या शालेय व्यवस्थापन समितीची कार्यकारणीत शिक्षक तज्ञ रावसाहेब चव्हाण व सदस्य रवींद्र धनगर सोपान पाटील प्रवीण पाटील अंगणवाडी सदस्या वंदना खोंडे कविता पारधी दुर्गा भिल टिना भिल अशी निवड अधिकृत घोषणा करण्यात आली.
निवडीनंतर आयोजलेल्या छोटेखानी सत्कार समारंभात किरण अहीरे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना समिती अध्यक्ष किरण अहीरे यांचे विचार ,
> "शाळा ही गावाच्या प्रगतीचा पाया आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे उपक्रम हाच आमचा मुख्य उद्देश राहील. संपूर्ण समितीचं नेतृत्व करताना मी जबाबदारीने आणि पारदर्शकपणे कार्य करीन."
गावातील शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी, पालक सदस्य आणि ग्रामस्थांनीही आपल्या भाषणातून अहीरे यांच्या निवडीचं स्वागत केलं आणि त्यांच्याकडून शाळेच्या विकासाबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या.
किरण अहीरे यांचे सामाजिक योगदान
किरण अहीरे हे गावात स्वच्छता मोहिम, विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप, महिला व युवकांसाठी कार्यशाळा, तसेच ग्रामविकास संबंधित उपक्रमांमध्ये सतत सक्रीय असतात. त्यांच्या सामाजिक योगदानामुळे त्यांची ओळख एक प्रेरणादायी कार्यकर्ता म्हणून झाली आहे.
गावकऱ्यांच्या अपेक्षा :
शाळेतील मुलभूत सुविधांची वाढ होईल,
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळेल,
गुणवत्तापूर्ण आणि संस्कारक्षम शिक्षण मिळेल,
शाळेचा परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि प्रेरणादायी बनवला जाईल.
ही निवड तहाडी गावाच्या शिक्षण क्षेत्रात एक नवा टप्पा ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला असून किरण अहीरे यांना त्यांच्या कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष किरण माधव अहीरे सतीश सोनवणे पोलीस पाटील प्रताप गिरासे, माजी ग्रामपंचायत सदस्य किरण भलकार, प्रफुल डांमरे विशाल करंके,कृषी मित्र किरण भामरे, योगेश पाकळे,ताराचंद जाधव, गौतम अहिरे,कैलास करंके,चुडामण भामरे, सामाजिक कार्यकर्ते भुषण बागुल, पत्रकार महेंद्र खोंडे, पत्रकार ज्ञानेश्वर सैंदाणे, किरण ठाकरे,कल्याण भलकार ,नारायण भलकार, भाऊसाहेब भलकार, संजय भलकार, रावसाहेब भलकार,सुनील भलकार ,कुणाल भलकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रविंद्र पाटील यांनी केले तर सुत्रसंचलन अशोक बडगुजर व आभार प्रदर्शन शुभांगी देवरे यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृदांनी मेहनत घेतली.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी : एका गंभीर आणि चिंताजनक घटनेत, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील स्थानिक नागरिक सध्या रामभरोसे सोडले गेल्याचे चित्र ...
-
थाळनेर (वार्ताहर)शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रामपंचायत व तेजस ऑनलाईन सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
नंदूरबार जिल्ह्यासह तालुक्यातील विखरण येथे कृषि विभागाची धडक कार्यवाही अंदाजित 2 लाख रकमेचा मुद्देमाल जप्त..! सिनेस्टाईल पाठलाग करून कृषी वि...
-
चिमठाणे गावातील चिमठाणे (पिप्रि )येथील सीताराम पाटील यांच्या सहकार्याने श्री क्षेत्र गांगेश्वर महादेव मंदिर हे तीर्थक्षेत्र असून सामाजिक कार...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
-
साक्री साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उषा पवारयांचा एकमेव अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी संजयबागडे अन् मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परद...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील श्री महेंद्र गोकुळ पाटील ( सोनू फौजी)* यांच्या देश सेवा निवृत्त निमित्त आज दि 27 रोजी गागेश्वर महादेव मंद...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा