Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ६ जुलै, २०२५

प्रतिपंढरपूर बाळदे येथे यात्रोत्सव संपन्न..!आषाढी एकादशीनिमित्त बाळदे येथे यात्रा उत्सव आयोजन



उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर तालुक्यातील प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या बाळदे येथे आषाढी एकादशीनिमित्त सहा  जुलै रविवार रोजी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आषाढी एकादशीनिमित्त शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते महाआरती करण्यात आले तसेच श्री पांडुरंगाला अभिषेक पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी केला यावेळी माजी जि प अध्यक्ष तुषार रंधे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी शिक्षण अधिकारी मनीष पवार माजी पंचायत समिती सदस्य यतीश सोनवणे आदी मान्यवर यांनी श्री पांडुरंगाचे दर्शन घेतले विविध क्षेत्रातील मान्यवरांची मंदियाडी दिवसभर सुरू होती

बाळदे येथे हजारो भाविक श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले होते 
आषाढी एकादशीला अनेक पायी दिंड्या जिल्ह्याभरातून या ठिकाणीय  आले होते या दिंडीतून येणाऱ्या वारकऱ्यांना राहण्यासाठी सभा मंडपाची तयारी ट्रस्टने केली होती. तसेच येणाऱ्या भाविकांसाठी वाहनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली होती. तसेच यात्रोत्सवानिमित्त विविध व्यावसायिक दुकाने थाटतात. फुले, पुजेचे साहित्य, खाद्य पदार्थांचे स्टॉल, संसारोपयोगी साहित्याची दुकाने, मनोरंजनासाठी पाळणे दाखल झाले होते.या व्यावसायिकांसाठी बाळदे ग्रामपंचायतमार्फत स्वतंत्र जागा उपलब्ध करुन देण्यात आली. तसेच येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यात्रेनिमित्त श्री विठ्ठल धाम ट्रस्टने आरोग्य सेवेची व्यवस्था होती.शिरपूर बस स्थानकापासून बाळदे येथे दर्शनासाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था करण्यात आली .

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शिरपूर येथील पोलीस निरीक्षक मनोज परदेशी व पथकाचा चोख पोलीस बंदोबस्त होता  तसेच यात्रोत्सवात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.
यात्रोत्सवासाठी श्री विठ्ठल धाम ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी आमदार संभाजीराव हिरामण पाटील,  सदस्य दुष्यंत मनोहर पाटील सचिव निंबा पाटील, माजी. जि.प. सदस्य जितेंद्र कुवर व ग्रामस्थ परिश्रम घेतले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध