Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २८ जुलै, २०२५

थाळनेर येथे सेंट्रल बँकेच्या वतीने सरकारी योजना जनजागृती शिबीर



थाळनेर (वार्ताहर)शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रामपंचायत व तेजस ऑनलाईन सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील नागरिकांना सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने २५ जुलै २०२५ रोजी वित्तीय समावेशन सतृप्तीकरण शिबिर सरकारी योजना जनजागृती कॅम्प आयोजित करण्यात आला होता.
        
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी थाळनेरच्या सरपंच मेघा संदीप पाटील ह्या होत्या. या कॅम्पमध्ये (शिबिरात) अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,सुकन्या समृद्धी योजना यासारख्या केंद्र सरकारच्या महत्वाच्या योजनांची माहिती थाळनेर शाखेचे मॅनेजर प्रांजली शिंदे,सेंट्रल बँक नाशिक विभाग पर्यवेक्षक अधिकारी करण मोरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. गावातील महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभाग घेत ऑनलाईन अर्ज भरले. 
     
यावेळी सेंट्रल बँक नाशिक विभाग पर्यवेक्षक अधिकारी करण मोरे, थाळनेर सेंट्रल बँक शाखेचे क्याशियर महेश नंदकिशोर माळवदे यांनी योजनांची पात्रता, हप्ता व विमा रक्कम यांची माहिती दिली. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रदीप मराठे,प्रमोद मराठे (तेजस ऑनलाईन सर्व्हिसेस), योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. 
 
       कॅम्पची ठळक वैशिष्ट्ये
         अटल पेन्शन योजना

१८-४० वयोगटा
तील नागरिकांना भविष्यात १००० ते ५००० पर्यंत मासिक पेन्शन मिळण्याची हमी.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना: वार्षिक १२ मध्ये अपघाती मृत्यू किंवा अपंगत्वासाठी २ लाखांचे विमा संरक्षण. 
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना: वार्षिक ३३६ मध्ये नैसर्गिक मृत्यूसाठी २ लाखांचे विमा संरक्षण. या उपक्रमात विशेषत शेतकरी, वृद्ध नागरिक, युवकांनीही योजना स्वीकारून कॅम्पचा लाभ घेतला. अशा उपक्रमांमुळे गावपातळीवर सरकारी योजनांबाबत जागरूकता वाढत असून, गरजू लोकांपर्यंत योजना थेट पोहोचवण्याचे कार्य शक्य होते असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध