Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २८ जुलै, २०२५
Home
/
Unlabelled
/
चिमठाणे गावातील श्री सिताराम अवचित पाटील यांनी श्री क्षेत्र गांगेश्वर येथील रस्त्याची सामाजिक बांधिलकी जोपासत स्वखर्चाने बुजवले खड्डे...
चिमठाणे गावातील श्री सिताराम अवचित पाटील यांनी श्री क्षेत्र गांगेश्वर येथील रस्त्याची सामाजिक बांधिलकी जोपासत स्वखर्चाने बुजवले खड्डे...
चिमठाणे गावातील चिमठाणे (पिप्रि )येथील सीताराम पाटील यांच्या सहकार्याने श्री क्षेत्र गांगेश्वर महादेव मंदिर हे तीर्थक्षेत्र असून सामाजिक कार्य करत जेसीबीच्या साह्याने मुरूम टाकून सहकार्य दाखविले.
चिमठाणे परिसरातील आरावे शिवरातील श्री क्षेत्र गांगेश्वर हे पंचक्रोशीतील श्रद्धेचे स्थान आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीला यात्रा भरते. व श्रावण मासात मोठ्या संख्येने भावीक दर्शनासाठी येत असतात. मात्र या ठिकाणी रोडा पासून तर मंदिरापर्यंत जाण्याच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती..याची दखल घेत.चिमठाणे गावातील जेष्ठ नागरिक तसेच सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असणारे श्री.सिताराम अवचित पाटील व त्याचे चिरंजीव अनिल सिताराम पाटील सामाजिक कार्यकर्ते पिप्रि येथील यांनी आज गागेश्वर महादेव मंदिर येथे जाण्यासाठी अगोदर कच्चा रस्ता होता परंतु मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने व मोठा खड्डा पडल्याने चिखल व पाण्याचे डबके साचले होते.त्या मुळे भाविकांना वाहणाने जाणे अवघड झाले होते. या गोष्टीची दखल घेत श्री.सीताराम पाटील यांनी या ठिकाणी मुरूम टाकून खड्डे बुजवण्यासाठी स्व:खर्चाने पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी राखत आज एक मोठे कार्य केले. त्या बद्दल परिसरातील नागरिकानसह भाविकांनी देखील समाधान व्यक्त केले.यावेळी श्री सिताराम अवचित पाटील माजी जि. प.सदस्य श्री खडू वंजी भिल, माजी उपसरपंच दिलीपसिंग गिरासे,अनिल पाटिल, लक्ष्मण माळी,अण्णा माळी,भानुदास पाटील,बादल गिरासे,सजू बाबा मराठे,महेंद्र पाटील,आण्णा माळी, भानुदास पाटील,विलास भिल,आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा