Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त
आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परिमंडळ खंबाळा नियतक्षेत्र अंबा येथे कक्ष क्र.८३३ मध्ये नेहमीप्रमाणे श्री. पवन राजाराम पावरा, वनरक्षक गस्त करीत असतांना प्रलंबित वनदावा क्षेत्र मध्ये मका, ज्वारी, बाजरीच्या मिश्र उभ्या पिकात संशय आलेवरुन त्या ठिकाणी पाहणी केली असतांना त्यांना सुकवलेला गांजा गोण्या व निळे प्लॉस्टिक ड्रम, पत्र्याची कोठी व कापडात बांधलेले गासोडे आढळून आले सदरची माहिती वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपवनसंरक्षक श्री नितीन सिंग यांना देण्यात आली. त्यांनी मा.श्री श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक यांना माहिती दिली. त्यांचे आदेशाने श्री. राहुल घरटे, सहा. वनसंरक्षक शिरपूर यांनी पोलीस स्टेशन सांगवी येथे गुप्त बातमी बाबत पत्रव्यवहार केला. पोलीस निरिक्षक श्री. जयपाल हिरे पोलीस स्टेशन सांगवी, पोलीस उपनिरिक्षक श्री. वसावे, व कर्मचाऱ्यांसह तसेच वनविभागचे अधिकारी/कर्मचारी यांचेसह बातमीची खात्री करण्याकामी संयुक्त कारवाई करण्याकामी घटनास्थळी रवाना झाले. सदर जागेवर जाऊन पाहणी केली असता सदर ठिकाणी सुकलेला अंमली पदार्थ गांजा मुद्देमाल साठवण करुन ठेवलेला आढळुन आला. सदर मुद्देमाल अदमासे ११०० किलो असुन जप्त करुन पोलीस स्टेशन सांगवी येथे आणण्यात आला. जप्त करण्यात आलेला सुका गांजा मुद्देमालाची किंमत बाजार भावप्रमाणे ५५,००००० लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. तसेच मुद्देमालबाबत जागेवर तपास केला असता मुद्देमाल कोणचा आहे, याबाबत माहिती मिळु शकली नाही. सदर कारवाईत वनविभागाचे श्री. काशिनाथ देवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी सांगवी, श्री. बिपीन महाजन वनपाल, पळासनेर अति. कार्यभार खंबाळा श्री. राजेंद्र शेटे, वनपाल सांगवी श्री. नितीन बेडसे, वनरक्षक चोंदीनाला, श्री. नरेद्र चित्ते, वनरक्षक बिजासणी श्रीमती आयोध्या नागपूर्णे, श्रीमती माधुरी परदेशी, श्रीमती विद्या ठाकरे, श्री. दानिल मावची, शासकीय वाहन चालक साहेबराव तुंगार, श्री. संदिप ठाकरे इ. सहभाग घेतला.
सदरची कारवाई मा.निनु सोमराज, वनसंरक्षक धुळे, मा. श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक धुळे, मा. नितीनकुमार सिंग उपवनसंरक्षक धुळे तसेच श्री. राजेंद्र सदगीर, विभागीय अधिकारी धुळे यांचे मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. व सदरची कारवाई वनविभाग व पोलीस विभागाचे गुप्त केली असुन पुढील सखोल तपास व कायदेशीर कारवाई पोलीस स्टेशन सांगवी मार्फत सुरु आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा