Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, १७ ऑगस्ट, २०२५
चिमुरडीवरील बलात्कारा विरोधात आदिवासी समाजाचा 'ऊलगुलान'- मूकमोर्चाचे आयोजन
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम ६५ (१), SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989, महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ (महाराष्ट्र अमेंडमेंट) ॲक्ट - 2020 व प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सस्युअल ऑफेन्सस ऍक्ट, २०१२ (पॉक्सो कायदा)” अंतर्गत फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकरणाचा खटला न्यायालयात चालवून सदर आरोपीला फाशीची शिक्षा होणे करीता शिरपूर तालुक्यातील समस्त आदिवासी समाजाने पोलीस निरीक्षक, शिरपूर तालुका पोलीस ठाणे, सांगवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ - स्वातंत्र्य दिनाच्या दिवसी शिरपूर तालुक्यातील मौजे दहिवद येथे एक अत्यंत गंभीर आणि अमानवी घटना घडली आहे. या घटनेत एका ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. ही घटना केवळ पीडितेच्या आयुष्यावर परिणाम करणारी नाही, तर संपूर्ण माणुसकीच्या अस्मितेवर आणि सुरक्षिततेवर आघात करणारी आहे. त्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो.सदर पीडित आदिवासी मुलीवर जिल्हा रुग्णालय धुळे येथे उपचार सुरु आहे; आणि सदर मुलगीची परीस्थिती नाजूक आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आदिवासी समाज हा शांततामय जीवन जगणारा असून, अशा घटनांनी त्यांच्या मूलभूत हक्कांवर आणि सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
निवेदनातून खालील मागण्या करण्यात आल्या.
१. संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत अपहरण व बलात्काराच्या गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवून, SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989, महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ (महाराष्ट्र अमेंडमेंट) ॲक्ट - 2020 व प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सस्युअल ऑफेन्सस ऍक्ट, २०१२ (पॉक्सो कायदा) अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
२. फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकरणाचा खटला चालवावा आणि आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी.
३. आरोपीची 24 तासाच्या आत तात्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात यावी.
४. पीडित मुलीला तात्काळ वैद्यकीय तपासणी, मानसिक आधार आणि संरक्षण उपलब्ध करून द्यावे.
५. पीडित कुटुंबाला शासनाच्या वतीने आर्थिक मदत व पुनर्वसनाची सुविधा द्यावी.
६. आदिवासी भागात सुरक्षा व्यवस्था वाढवून महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात.
सदर गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन प्रभावी पावले उचलावीत, जेणेकरून पीडितेला न्याय मिळेल आणि समाजात कायद्याबद्दल विश्वास निर्माण होईल. अन्यथा येत्या काही दिवसात समाजाच्या वतीने शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन करण्यात येईल.
दि. १८ वार सोमवारी चोपडा जीन पासून ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापर्यंत मुक मोर्चा काढून समाजातर्फे निवेदन देण्यात येणार आहे.
निवेदन देताना असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा