Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नंदुरबार जिल्हा सचिवपदी मुजम्मिल हुसैन यांची नियुक्ती..!



नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेने नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अभिजीत दादा मोरे यांच्या हस्ते श्री. मुजम्मिल हुसैन यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नंदुरबार जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्ती सोहळ्याला शोएब भाई खाटिक आणि महिला जिल्हा अध्यक्ष सीमा ताई सोंगरे उपस्थित होत्या.

नियुक्तीनंतर मुजम्मिल हुसैन यांनी पक्षाच्या कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच, पक्षातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांचे आभार मानले, ज्यांनी त्यांना या जबाबदारीसाठी पाठबळ दिले. “आपल्या सर्वांच्या सहकार्याने पक्षाच्या ध्येयधोरणांना गती देण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन,” असे त्यांनी नमूद केले. या नियुक्तीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याला नवीन दिशा आणि गती मिळण्याची अपेक्षा आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध