Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

४० लाखाचा देशी दारूचा कारखाना पकडला , तिघांना ताब्यात घेतले

पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त

   अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धाड टाकून बनावट  दारूचा कारखाना उध्वस्त केला आहे. सुमारे ४० लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

      पारोळा तालुक्यात बहादरपूर येथे बेकायदेशीर देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन सानप याना मिळल्यावरून त्यांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची परवानगी घेऊन डीवायएसपी विनायक कोते , पोलीस निरीक्षक सानप , अमोल दुकळे , सुनील हटकर , महेश पाटील , डॉ शरद पाटील , प्रवीण पाटील , अनिल राठोड , अजय बाविस्कर , आकाश माळी , विजय पाटील , शेखर साळुंखे , वेलचंद पवार , संजय पाटील आदींच्या पथकाने धाड टाकून बहादरपूर येथील बोरी नदीच्या काठावरील पत्र्याच्या शेड मध्ये   सुरू असलेला देशी दारूचा बेकायदेशीर कारखाना उध्वस्त  केला. राकेश छगनलाल जैन , टिन्या डेंगऱ्या पावरा , कितारसिंग गण्यासिंग पावरा या तिघांना ताब्यात घेऊन त्याच्याजवळून आर ओ मशीन , मिक्सर मशीन , पाणी लिफ्टिंग मशीन , स्टेबिलायझर  मशीन , बॉटल सिलिंग व पॅकिंग मशीन , तसेच दारूच्या बाटल्या , मालवाहू गाडी , एक कार , पत्र्याचे शेड असा एकूण  ४० लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध