Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २६ ऑगस्ट, २०२५

आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन (बालक बचाव संरक्षण नेटवर्क ) मेळाव्याचे आयोजन

प्रतीनिधी :- गणेश चव्हाण
दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यांच्या पालकांचा तसेच चाइल्ड सर्वांवर नेटवर्क (बालक बचाव संरक्षण नेटवर्क )  मेळाव्याचे आयोजन जस्ट राईट फॉर चिल्ड्रेन्स प्रकल्पांतर्गत ,मराठा मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते, शासनातर्फे अनाथ एकल किंवा अपंग पालकांच्या बालकांसाठी बालसंगोपन योजना राबविली जाते विशेषता कोरोना नंतर जी मुलं अनाथ झाली त्यांचा यात समावेश करण्यात आला आणि या बालकांच्या काळजी व संरक्षणाचे कार्य संस्थांमार्फत करण्यात येते. चोपडा व अमळनेर येथील मुलांची काळजी आधार संस्थेमार्फत घेतली जाते , पालक बालकांमध्ये संवाद व्हावा त्यांना सविस्तर माहिती मिळावी म्हणून पालक बालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्यात साडेचारशे पालक व बालकांनी आपला सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अमळनेर चे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी आपल्या उद्घाटन पर भाषणात मुलांशी संबंधित असलेले कायदे व पोलीस विभागाची कार्यप्रणाली समजावून सांगितले. प्रमुख वक्ता म्हणून नायब तहसीलदार श्री प्रशांत धमके यांनी शासनामार्फत बालकांसाठी असलेल्या योजना विषयी माहिती दिली.प्रमुख वक्ता श्री ज्ञानेश्वर पाटील बालपरीवेक्षिका अधिकारी जिल्हा महिला बालविकास विभाग जळगाव व श्री पवन पाटील बाल संरक्षण अधिकारी जळगाव यांनी बाल बालसंगोपन योजनेविषयी सविस्तर माहिती दिली, ज्यात कुठले कुठले बालके योजनेचा लाभ घेऊ शकतात योजनेला अर्ज करताना कुठल्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते याबाबत सविस्तर माहिती दिली. जळगाव बालकल्याण समितीच्या सदस्या सुरेखा पवार यांनी बालकांच्या वाढीमध्ये मानसिक आरोग्याची भूमिका किती महत्त्वाची आहे आपण पालक म्हणून स्वतःचे मानसिक आरोग्य नीट राखणे व बालकांना पण ते राखण्यासाठी मदत करणे याबाबत अतिशय प्रभावी संवाद साधला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जळगाव बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. उषा साळुंखे ह्या होत्या त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बालकल्याण समितीची भूमिका, जी बालके काळजी व संरक्षणा खाली येतात या बालकांना शासनातर्फे उपलब्ध असलेल्या सर्व सेवा सुविधा यांची माहिती दिली. मराठा समाज मंडळाचे सदस्य श्री विक्रांत पाटील यांनी आधार संस्थेच्या कामाचे कौतुक करत सर्व बालकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आधार संस्थेचे अध्यक्ष डॉ. भारती पाटील यांनी मांडले ज्यात संस्था करीत असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच बालकांच्या कामातील सामाजिक संस्थेचा भूमिकेबाबत सांगितले, आधार संस्थेच्या कार्यकारी संचालक रेणू प्रसाद यांनी संस्थेच्या वतीने कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार मानले कार्यक्रम आयोजनासाठी प्राध्यापक विजय वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन अश्विनी भदाणे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आधार संस्थेच्या दीपक संदनशिव, संजय कापडे, राकेश महाजन, कलीम खान, मुरलीधर बिरारी आनंद पगारे, मोहिनी धनगर, ऊर्जेता शिसोदे,  ज्ञानेश्वरी पाटील,अतित जैन, भावना सूर्यवंशी, दीप्ती गायकवाड ,समाधान अहिरे,  पूनम पाटील, तोसीफ शेख, यास्मिन शेख,वंदना पावरा, विकी अहिरे,यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडत कार्यक्रम यशस्वी केला तसेच कार्यक्रमासाठी समाजकार्य महाविद्यालय अमळनेरचे विद्यार्थी प्रतिनिधी भावेश मराठी, अनुजा, कीर्ती, चेतना व आकाश यांनी देखील सहभाग नोंदवला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध