Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २६ ऑगस्ट, २०२५

शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्रामस्थांना आश्रू अनावर झाले होते.

दशरथ शांताराम पाटील (वय ४१) या सीआयएसएफ जवानाला मुंबई येथे २३ रोजी  कर्तव्यावर मृत्यू आला होता. त्याचे पार्थिव २५ रोजी अमळनेरात आणण्यात आले. अंबारे आणि खापरखेडा येथील दोन्ही गावात घरोघरी रांगोळ्या टाकण्यात आल्या होत्या. प्रत्येक घरी पार्थिवाची पूजा करण्यात आली. खान्देश सुरक्षा रक्षक आणि करणखेडा  माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वीर जवानाला सलामी देण्यासाठी ३०० फूट तिरंगा रॅली काढली. वीर जवान अमर रहे , दशरथ पाटील अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.  पार्थिवावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. खासदार स्मिता वाघ, जयवंतराव पाटील, शांताराम पाटील, शिवाजी पाटील, प्रताप पाटील  सभापती अशोक पाटील,  माजी सभापती प्रफुल पाटील, जयश्री पाटील, समाधान धनगर, गोकुळ पाटील, बी. के. सूर्यवंशी, डी. एम. पाटील, जे. के. पाटील, संजय सैंदाणे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. सिआयएसएफचे जवान चरणसिंग, मोहन जाधव, दीपक जुगदार, चेतन पाटील, काकासाहेब बावसकर, महेश जाधव, नामदेव चव्हाण यांनी शासकीय सलामी देऊन हवेत तीन वेळा गोळीबार केला. यावेळी स्थानिक पोलीस अधिकारी जीभाऊ पाटील, विनोद पवार, फिरोज बागवान, सुनील पाटील, संजय पाटील, रेखा ईशी, स्मिता भालदे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध