Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ५ ऑगस्ट, २०२५

साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा



साक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना आवश्यक वेळी मदतीचा हात मिळणार आहे.शववाहिनीचे लोकार्पण करण्यात आले.
भाजपाचे प्रांतिक सदस्य सुरेश रामराव पाटील व त्यांच्या पत्नी माजी सभापती मंगलाताई पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व रिबीन कापून करण्यात आले.नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण कें द्राजवळ झालेल्या या कार्यक्रमाला नगराध्यक्ष उषाताई पवार,गटनेते बापूसाहेब गीते,
पाणीपुरवठा सभापती दीपक वाघ,नगरसेवक अॅड. गजेंद्र भोसले, विरोधी पक्षनेते पंकज मराठे,नगरसेवक सुमित नागरे, राहुल भोसले, प्रवीण निकुंभ,संगीता भावसार,रेखा सोनवणे, जयश्री पगारिया,स्विकृत नगरसेवक पंकज हिरे, अॅड.सूर्यकांत सोनार,विजय भोसले,आबा सोनवणे,अनिल
पवार, विनोद पगारिया,याकूब पठाण, महेंद्र देसले, स्वप्निल भावसार,योगेश चौधरी,कुणाल देशमुख तसेच आरोग्य निरीक्षक रुपेश पाटील,लिपिक जयदीप आव्हाड,मुकादम कर्मचारी रवींद्र चव्हाण,पंडित चव्हाण, निलेश राठोड व महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध