Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ५ ऑगस्ट, २०२५
Home
/
Unlabelled
/
तब्बल 7 ते 8 वर्षानंतर शेणपूर गावात खानदेशी कानुबाई मातेचा उत्सव मोठया उत्साहात संपन्न झाला.
तब्बल 7 ते 8 वर्षानंतर शेणपूर गावात खानदेशी कानुबाई मातेचा उत्सव मोठया उत्साहात संपन्न झाला.
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला यामध्ये माहेरवासीनी सगळे नातेवाईक कानुबाई उत्सवासाठी गावी येत असतात.माहेरवाशीने सासरवासीनी जुन्या मैत्रिणी या उत्सवासाठी आवर्जून उपस्थित राहतात साक्री तालुक्यातील शेणपूर गावांमध्ये हा उत्सव 8 ते 10 वर्षानंतर साजरा करण्यात आला दिनांक 4 ऑगस्ट 2025. रोजी कानबाई मातेची स्थापना करून रोट चा नैवेद्य देण्यात आला.गावात मुख्यतवे काकूंस्ते,नांद्रे,बच्छाव, पगारे,भदाणे या कुळचा परिवारांमध्ये ही कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली होती.रात्रभर कानुबाई मातेचा जागर नृत्य करून दुसऱ्या दिवशी कानुबाई मातेचे वाजत गाजत नदीवर विसर्जन करण्यासाठी कानुबाई मातेला डोक्यावर घेऊन वाजत गाजत डोल तशाचा गजरात व
डीजेच्या तालावर व कानुबाईचे अहिराणी गीतांवरती ताल धरत संपूर्ण गावातून मिरवणूक काढून तीन चार वाजता पांझरा नदीत कानुबाई मातांचे विसर्जन करण्यात आले. या उत्सवाने संपूर्ण गावात आनंदाचे तसेच एकोप्याचे वातावरण दिसून आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा