Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
श्रीमती.एच.आर.पटेल कला महिला महाविद्यालयात 24 सप्टेबर हा राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा..!
श्रीमती.एच.आर.पटेल कला महिला महाविद्यालयात 24 सप्टेबर हा राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा..!
शिरपूर प्रतिनिधी/ श्रीमती.एच.आर.पटेल कला महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागच्या वतीने ‘राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा’ या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या उप-प्राचार्य डॉ. गजानन पाटील होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तथा मार्गदर्शक डॉ.अतुल खोसे (राष्ट्रीय सेवा योजना तालुका समन्वयक ) होते.डॉ.अतुल खोसे यांनी राष्ट्रीय सेवा योजना एककांची सुरुवात 24 सप्टेंबर 1969 मध्ये झाली. हा दिवस का साजरा केला जातो याचे महत्त्व सांगितले. गांधी शताब्दी वर्षा निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना या एककाची सुरुवात भारतातील अनेक विद्यापीठांमधील महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आली याचा हेतू असा की महाविद्यालयातील तरुणांचे चारित्र्य संपन्न, व्यक्तिमत्व विकासाला झाला पाहिजे.कारण भारतातधार्मिक, सामाजिक, भौगोलिक विविधता मोठ्या प्रमाणात आहे. परंतु राष्ट्रीय सेवा योजनेतून राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली जाते. कारण महाविद्यालयात विविध जाती धर्मातील तरुण – तरुणी शिक्षण घेत असतात.त्यंच्यात राष्ट्रीय व सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेतून केला जातो.
समाजातील, राष्ट्रातील, राज्यातील तसेच ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे एक खुले व्यासपीठ आहे.
असे डॉ.अतुल खोसे यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले.अध्यक्षीय समारोप प्रसंगीउप- प्राचार्य डॉ. डॉ. गजानन पाटील यांनी विद्यार्थिनींना राष्ट्रीय सेवा योजना ही आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.कारण या माध्यमातून आपण अंधश्रद्धा निर्मुलन,महापूर निधी संकलन, रक्तदान शिबीर त्याच बरोबर विद्यापीठ कार्य क्षेत्रात घेले जाणारे विविध शिबिरे यांच्यात आपला सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.
असे मार्गदर्शन करतांना सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.एम.वाडीले यांनी केले. तर सूत्र संचलन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.भास्कर खैरनार यांनी केले. आभार कु. कोमल पारधी यांनी मानले.कार्यक्रमास सर्व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.मनीषा चौधरी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री जगदीश चौधरी,दक्षा शर्मा, तृप्ती जोशी, श्रीमती,अनिता धनगर,राहुल पगारे, नानाभाऊ सोनवणे, अजय गोयल यांनी सहकार्य केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
तरुणी बेपत्ता शेतातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा संशय अमळनेर तालुक्यातील कळंबु येथे शेतात कामासाठी गेलेली १५ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्...
-
नाशिक प्रतिनिधी नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील उड्डाणपुलावर एसटी महामंडळाच्या नंदुरबार डेपोच्या बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. बसमध्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा