Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १७ सप्टेंबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्य याचे राज्यस्तरी अधिवेशन यशस्वीरीत्या सोलापूरात पडले पार
माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्य याचे राज्यस्तरी अधिवेशन यशस्वीरीत्या सोलापूरात पडले पार
दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी, माहिती अधिकार कार्यकर्ते महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष बसवेकर ह्यांच्या अथक व अजोड प्रयत्नातून आयोजित भव्य कार्यकर्ता अधिवेशन – २०२५, सोलापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
या अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. जितेंद्र भावे सर, संस्थापक व अध्यक्ष – निर्भय महाराष्ट्र पार्टी यांची उपस्थिती ही आमच्यासाठी प्रेरणादायी ठरली त्यांनी आता माहिती अधिकार कायदा वाचावाण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल असे संबोधून सर्वं श्रोत्यांस जमिनी स्थरावर ते करत असलेल्या कार्याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
संपूर्ण कार्यक्रम अत्यंत जोमाने, नीटनेटकेपणाने पार पाडल्याबद्दल व सोलापूर जिल्हा कार्यकारिणीने शहरातून आलेल्या सर्व माहिती अधिकार कार्यकर्त्यांची राहण्याची व खाण्यापिण्याची उत्कृष्ट व्यवस्था केल्याबद्दल व हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आम्ही धुळे जिल्ह्याच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत.
हा सन्मान केवळ माझ्यासाठी नाही तर माहिती अधिकाराच्या लढ्यात एकनिष्ठपणे कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या परिश्रमांचे प्रतिनिधित्व आहे. आपल्या हस्ते मिळालेल्या या गौरवामुळे माझी जबाबदारी आणि कार्यकर्तृत्वाची दिशा अधिक ठाम झाली असून, आगामी काळात मी माहिती अधिकार चळवळीला अधिक धार देण्यासाठी, भ्रष्टाचाराविरुद्ध ठाम उभे राहण्यासाठी आणि जनतेच्या न्यायासाठी झटण्यासाठी अखंड प्रयत्नशील राहीन, याची खात्री आपणास देतो.आपल्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे आम्ही सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि बळ मिळत आहे. हा गौरव माझ्यासाठी आयुष्यभर स्मरणीय ठरणार आहे.
पुन्हा एकदा आपला मनःपूर्वक आभार!
आपले
पुनमचंद आनंदा मोरे
धुळे जिल्हा अध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्य
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
तरुणी बेपत्ता शेतातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा संशय अमळनेर तालुक्यातील कळंबु येथे शेतात कामासाठी गेलेली १५ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्...
-
अमळनेर तालुक्यातील गांधली येथील तरुणीच्या मृत्यू प्रकरणी तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गांधली येथील ज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा