Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

श्रीमती.एच.आर.पटेल महिला महाविद्यालयात जागतिक ओझोन दिवस करण्यात आला साजरा



शिरपूर प्रतिनिधी :- मती.एच.आर.पटेल महिला महाविद्यालयात जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यात आला.16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिनाच्या निमित्त प्रमुख वक्ते तथा मार्गदर्शक म्हणून फार्मसी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ.अतुल शिरखेडकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा शितोळे होते.

डॉ.अतुल शिरखेडकर यांनी  ओझोन क्षयाची कारणे काय?  या बाबत अभ्यासपूर्ण माहिती दिली. विविध दाखले देऊन विद्यार्थीनीना आपण वर्तमान काळाचे या वसुंधरेचे सदस्य आहोत.म्हणून पर्यावरणी घटकांवर मानवाचा अतिरेकी हस्तक्षेप भविष्यात येणाऱ्या पिढीला संकटे उभी करणारी ठरतील म्हणून  पर्यावरणा बाबत दक्षता किंवा काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. प्रदूषण कमी कसे करता येईल यासाठी त्यांनी छोटी छोटी उदारणे देऊन आपली भूमिका सांगितली उदा. सायकलीचा वापर करणे,सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करणे, वृक्ष लागवड करून ती जगविणे,इंधनाचा वापर कसा कमी करता येईल या बाबत समाजा मध्ये जागृती निर्माण करणे. असे अनमोल मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाच्या  प्राचार्या डॉ. शारदा शितोळे  यांनी मार्गदर्शन करतांना जगात औद्योगीकरण, शहरीकरण, रासायनिक पदार्थांचा अतिरेकी वापर, इंधनज्वलन या विविध कारणांमुळे ओझोन क्षय होत असल्याचे त्यांनी सांगितले.त्याचा मानवी आरोग्यावर, त्याचबरोबर शेती पिकांवर, वनस्पतींवर आपायकारक परिणाम होत असल्याचे दाखले दिले. कार्यक्रमाचे प्रास्तावित भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.एम.वाडीले यांनी केले. 

सूत्र संचलन कु.सानिया पिंजारी व आभार कु.दिव्या मोरे यांनी केले. भूगोल विभागाचे प्रा.के. सी. तडवी व भूगोल  विभागाच्या  विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  शिक्षकेतर सहकारी श्री.जगदीश चौधरी, तृप्ती जोशी, दक्षा शर्मा,नानाभाऊ सोनवणे,अनिता धनगर,अजय गोयल कु.प्रणाली थोरात,
कविता सोनवणे, बसंती पावरा, संध्या पवारा,सारिका पवारा, काजल तावडे,कोमल पारधी, नंदिनी पाटील,तसेच द्वितीय व तृतीय वर्षाच्या भूगोल विभागाच्या विद्यार्थीनिंनी सहकार्य केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध