Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

साक्री तालुका भाजप नेते श्री.हर्षवर्धन दहिते व शेणपूर गावाचे सामाजिक कार्यकर्ते सागर काकूंस्ते यांचा संकल्पनेतून शेणपूर चा सरपंच सौं निकिता आकाश काकूंस्ते यांचा हस्ते वडाचा झाडाची पुनर लागवड करण्यात आली.7



साक्री तालुका भाजपचे नेते जिभाऊ सो हर्षवर्धन दहिते व शेनपुर गावचे सामाजिक कार्यकर्ते सागर काकुस्ते यांच्या संकल्पनेतून शेनपुर फाट्यावर शंभर वर्ष जुने वडाचे झाड शेणपूर फाट्यालगत पुनर्लागवड करण्यात आली. शेणपूर गावाचा सरपंच सौं.निकिता आकाश काकूंस्ते. ग्रामपंचायत शेणपूर यांचा शुभ हस्ते झाडाचे पूजन करून पुनर लागवड करण्यात आले यावेळी झाडाचा बुडाखाली कोकोपीट व निम ऑइल व बोर्डो पेस्ट करून वडाचा झाडाची जैविक पद्धतीने लागवड करण्यात आली.साक्री तालुक्यातील हा पहिला री प्लॅन्टेशन चा यशस्वी प्रयोग शेणपूर फाट्यावर हायवे लगत करण्यात आला. त्याच्यामुळे वृक्षांची होणारी कत्तल कशी थांबवता येईल.या उद्देशाने हा एक नवीन सामाजिक उपक्रम शेणपूर वासियांना दाखवून दिला.यात प्रमुख भूमिका सामाजिक कार्यकर्ते श्री.सागर काकूंस्ते यांची होती.यावेळी शेणपूर गावातील समस्त गावकरी उपस्थित होते.या निर्णयाचे सर्वच भागातून शेणपूर वासियांचे कौतुक  होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध