Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

नंदुरबारमध्ये कपडे घेण्यावरुन झालेल्या वादात 32 वर्षीय तरुणाला चाकूने भोसकण्याची घटना



नंदुरबार प्रतिनिधी:- शहरात दोन गटात झालेल्या मारहाणीत दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. यात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयेश भिल (अंदाजे वय ३२, ) असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली फिर्याद अजय दारासिंग पवार याने दिली. अजय व मित्र जयेश भिल हे सिंधी कॉलनीतील दुकानात कपडे घेत असतांना त्या ठिकाणी सूर्यकांत सुधाकर मराठे व चेतन चौधरी हे आले. त्यांनी तुम्ही कधीपासून शोरूममधून कपडे घेऊ लागले असे सांगून त्यांना डिवचले.

त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. वादानंतर अजय व जयेश हे तेथून दुचाकीवर निघून जात असताना सूर्यकांत व चेतन तेथे आले. सूर्यकांत याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून चाकू काढून जयेश याच्या पोटावर व छातीवर वार केला. त्यात तो गंभीर जखमी झाला.

जयेशला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्याचा उपचारादम्यान मृत्यू झाला. याबाबत सूर्यकांत सुधाकर मराठे व चेतन चौधरी रा. नंदुरबार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. उपनगर पोलिसात आणि शहर पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी एका संशयिताला अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध