Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५

माथेफीरुने एका तरुणाच्या डोक्यात दगड टाकुन केला खुन



अमळनेर (प्रतिनिधी) पैलाड येथील हेडावे नाक्यावर माथेफीरुने एका तरुणाचा रविवारी मध्यरात्री खून केल्याची खळबळजनक घटना घडली. पोलिसांनी या माथेफिरूला अटक केली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक येथील निखिल विष्णू उतकर हा गेल्या काही दिवसापापासून शहरात वेडसर म्हणून फिरत होता. नागरिक त्याला घाबरत हकलून लावत होते. तर खाण्यापिण्यासह मदतही करीत होते. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पैलाड येथील मुकेश भिका धनगर (39) यांचे काही वाद झाले असतील. त्यातून निखिल उतकर याने मुकेश याचा मुडदा पाडला. नवरात्रीच्या पहिल्याच पहाटे ही घटना उघडकीस आल्याने पोलिसांनी घटनेच्या तपासाला वेग दिला. त्यात निखिल उतकर या संशयिताला अटक केली आहे. तर मुकेश याचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध