Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५

आजपासून शासनाचे जीएसटी चे दर झाले कमी झाले परंतु छोट्या दुकानदारांची मात्र गोची कायम.



आज पासून केंद्र सरकारच्या जीएसटी कौन्सिल ने नवे जीएसटी स्लॅब लागू केले खरे मात्र जिल्ह्यातील काही दुकानदारांची बेकरी विक्रेत्यांची मात्र चांगलीच गोची झाल्याचे चित्र आहे. कारण अजूनही काही उत्पादने किंवा किराणा माल जो जुन्या दराने जी एस टी देऊन खरेदी केला आहे तो आता नव्या स्लॅब प्रमाणे विकावा लागेल म्हणजे आधी २८ टक्के असणारा जी एस टी आता १८ टक्क्यांवर आलाय म्हणजे १० टक्के कमी दर घेऊन उत्पादनाची विक्री आजपासून करावी लागणार आहे. 

पण यात आता नुकसान आमचेच आहे अशा भावनाही काही विक्रेत्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केल्यात. आज पासून जी एस टी उत्सव साजरा करण्याचे नवरात्री च्या पूर्वसंध्येला जनतेला संबोधताना आवाहन केले होते मात्र आज काही ठिकाणी दुकानांमधून आणि बेकारी विक्रेत्यांकडे ग्राहकांशी वादाचे प्रसंग ओढवले आहेत. काही खरेदीदार ग्राहकांनी आज लागू झालेल्या जी एस टी च्या दरात आम्हाला उत्पादने हवी असल्याची आग्रही मागणी केली मात्र काही दुकानदार जुन्याच दराने विक्रीवर ठाम आहेत. ग्राहक आणि दुकानदार आपापल्या जागी सध्या तरी यीग्य आहेत असे वाटते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध