Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
वाडी येथे बनावट दारूचा अड्डयावर छापा; ३७,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात
वाडी येथे बनावट दारूचा अड्डयावर छापा; ३७,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने वाडी गावात मानवी आरोग्यास अपायकारक असलेली बनावट दारू तयार करण्याचा एक कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ३७,६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे, तर त्याचा मुलगा फरार झाला आहे.
पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, वाडी येथील किस्मत भगवान कोळी (वय ४९) हा त्याच्या घरात बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना चालवत होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी २१ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १:४५ वाजता किस्मत कोळीच्या घरावर छापा टाकला.
छाप्यादरम्यान, पोलिसांनी घराच्या आतमध्ये बनावट दारू तयार करण्याचे साहित्य आणि तयार दारूसाठा जप्त केला. यामध्ये १५,००० रुपयांचे मेटल इंडस्ट्रिज कंपनीचे मशीन, २०,००० रुपयांचे १०० लिटर स्पिरिट असलेले प्लास्टिकचे कॅन आणि १६०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या रिकाम्या व भरलेल्या बाटल्या तसेच बुचे असा एकूण ३७,६०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
पोलिसांनी किस्मत कोळीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने त्याचा मुलगा समाधान किस्मत कोळी याच्या मदतीने हा कारखाना चालवत असल्याची कबुली दिली. ते दोघे मिळून बनावट 'टॅगो' आणि 'सखु संत्रा' देशी दारू तयार करून विकत होते. पोलिसांनी किस्मत कोळीला ताब्यात घेतले असून, त्याचा मुलगा समाधान कोळी मात्र फरार आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पवार यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
तरुणी बेपत्ता शेतातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा संशय अमळनेर तालुक्यातील कळंबु येथे शेतात कामासाठी गेलेली १५ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्...
-
अमळनेर तालुक्यातील गांधली येथील तरुणीच्या मृत्यू प्रकरणी तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गांधली येथील ज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा