Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
मोटारसायकल चोर अखेर नरडाणा पोलिसांच्या जाळ्यात, 8 लाख 60हजाराच्या 13मोटारसायकली जप्त
मोटारसायकल चोर अखेर नरडाणा पोलिसांच्या जाळ्यात, 8 लाख 60हजाराच्या 13मोटारसायकली जप्त
बेटावद प्रतिनिधी – नरडाणा पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे सराईत मोटारसायकल चोरांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत तब्बल १३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत अंदाजे ८ लाख ६० हजार रुपये इतकी आहे.
दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १ ते ३ वाजेच्या दरम्यान नरडाणा येथून एमएच १८ सीडी ८६७५ क्रमांकाची मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १४१/२०२५, कलम ३०३(२) प्रमाणे नोंद करण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तुषार अमृत खैरनार (वय २५, रा. वाघाडी, ता. शिंदखेडा, जि. धुळे) यास ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने होंडा शाइनसह विविध कंपनींच्या तब्बल १३ मोटारसायकली चोरी केल्याचे उघड झाले.
आरोपीचा साथीदार दिपक कैलास बागुल (रा. सुरत) हा फरार असून, या दोघांनी मिळून धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांमधील अनेक ठिकाणी मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी तुषार खैरनार यास अटक करण्यात आली असून फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे.
या कारवाईत नरडाणा पोलीस स्टेशनचे प्रभारी निलेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र महाले, विजय आहेर, पो. हे. कॉ. ललित पाटील, चंद्रकांत साळुंखे, विक्रांत देसले, नारायण गवळी, पो. ना. भुरा पाटील, पो. कॉ. विजय माळी, विनोद कोळी, सुरज साळवे, अर्पण मोरे, प्रशांत पाटील, सचिन बागुल यांचा विशेष सहभाग होता. पुढील तपास पो. ना. भुरा पाटील करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
तरुणी बेपत्ता शेतातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा संशय अमळनेर तालुक्यातील कळंबु येथे शेतात कामासाठी गेलेली १५ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्...
-
अमळनेर तालुक्यातील गांधली येथील तरुणीच्या मृत्यू प्रकरणी तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गांधली येथील ज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा