Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांचे अपात्र असल्याचे कारण द्या; सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ढोले यांची निवेदनाद्वारे मागणी..!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांचे अपात्र असल्याचे कारण द्या; सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ढोले यांची निवेदनाद्वारे मागणी..!
धडगाव प्रतिनिधी/ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पडताळणी पूर्ण झाली आहे त्यात अनेक लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत परंतु लाभार्थी महिला अपात्र का ठरल्या आहेत?ह्याचे कोणतेही कारण लाडक्या बहिणींना शासन किंवा प्रशासनाकडून दिले गेले नाही तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुरू झाली आहे लाडक्या बहिणींची ई-केवायसी करत असतांना वडील किंवा पतीचे आधार आवश्यक केले आहे परंतु ज्या लाभार्थी अविवाहित बहिणींचे वडील व विवाहित महिलेचे पती हयात नाही त्यांनी ई-केवायसी कशी करावी?हा संभ्रम लाडक्या बहिणींमध्ये निर्माण होत आहे.ई-केवायसी करत असतांना वेबसाईट हळूवार चालत असल्यामुळे ई-केवायसी करणे अवघड होतांना दिसून येत आहे.
ह्याच बाबी लक्ष्यात घेता अपात्र लाभार्थी महिलांचे अपात्र ठरल्याचे कारण द्यावे,विवाहित लाडक्या बहिणींचे पती किंवा अविवाहित लाडक्या बहिणींचे वडील हयात नसल्यास त्यांचासाठी ई-केवायसी करण्यास येणारा अडथळा दूर करावा व ई-केवायसी सुरळीत करावी अशा मागणीचे निवेदन नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ.मिताली शेठी यांच्याकडे अक्राणी तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ढोले यांनी दिले आहे.निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा