Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

श्रीमती.एच.आर.पटेल कला महिला महाविद्यालयात ‘ 27 सप्टेबर जागतिक पर्यटन दिवस साजरा’



शिरपूर प्रतिनिधी/  27 सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनाच्या औचित्य साधत आज श्रीमती.एच.आर.पटेल कला महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा.डॉ.एच.आर.चौधरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन ही या वर्षाची आंतरराष्ट्रीय (Tourism and Sustainable Transformation) ही थीम होती.जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने सकारात्मक बदलाचे प्रतिनिधित्व म्हणून पर्यटनाच्या परिवर्तनात्मक क्षमतेवर प्रकाश टाकण्यासाठी अशा विविध गोष्टींची उकल या दिनानिमित्ताने व्हावी हा उद्देश कार्यक्रम घेण्या मागचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून स्थान मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना चालना देण्यासाठी ही आनंदाची बाब म्हणावी लागेल. महाराष्ट्रात अनेक धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक तसेच प्राचीन स्थळे असल्यामुळे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अनुकूल अशी परिस्थिती आपल्या राज्यात आहे. 

त्याचबरोबर देशातील अनेक राज्यांमध्ये पर्यटनाबाबत जागरूकता निर्माण झाल्यामुळे देश- विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर केला जातो उदा.-वृत्त पत्रातील जाहिराती, दूरदर्शन वरील जाहिराती इत्यादी.त्याचबरोबर महाविद्यालयात व शाळेत पर्यटन दिन साजरा करून विद्यार्थ्यांकडून समाजापर्यंत पर्यटनाबाबत जनजागृती निर्माण व्हावी  असे प्रा. डॉ एच.आर.चौधरी यांनी मार्गदर्शन कर्तनन सांगितले. प्रा.डॉ. आर.एम. वाडीले यांनी  हा दिवस साजरा केला जातो. या बाबत  प्रास्ताविकातून सविस्तर माहिती दिली. पर्यटन हा अप्रत्यक्ष उद्योग आहे. अनेक रोजगाराच्या संधी पर्यटनातून उपलब्ध होतात.राष्ट्रीय, प्रादेशिक व स्थानिक पर्यटनाला चालना मिळते. कारण पर्यटनामुळे अनेक आर्थिक क्रिया घडतात व रोजगार मोठ्या प्रमाणात वोकासित होतात.वाहतूक-दळणवळण,हॉटेल, उपहारगृह,सिनेमागृह,बाजारपेठ या घटकांची निर्मिती पर्यटनाचा ठिकाणी झपाट्याने होत जाते.असे प्रा. डॉ.आर.
एम.वाडीले यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रंथालय विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.एच.एम.
चौधरी होते.

या कार्यक्रमास उपस्थित प्रा.डॉ.राहुल,
प्रा.डॉ.अतुल खोसे,प्रा.केशव तडवी, प्रा. गुलाब वळवी व या कार्यक्रमाचे आयोजक महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एम. व्ही. चौधरी व सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा.भास्कर खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी. तर आभार प्रदर्शन कु. नंदिनी पाटील यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध