Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५
25 वर्षे देशसेवा करून जवान रघुनाथ नामदेव मोरे हे (CRPF) मधुन सेवानिवृत्त
अमळनेर : भारतीय सेनेतील (CRPF) शूर जवान रघुनाथ नामदेव मोरे यांनी तब्बल25 वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्ती घेतली आहे. त्यांनी आसाम,लेह लद्दाख दिल्ली व ओडिसा छत्तीसगड सारख्या नक्षली भागात मध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता.
रघुनाथ नामदेव मोरे
हे मुळ राहणार टाकरखेडा गावाचे रहिवासी आहेत सद्या ते अमळनेर येथे रहिवासी आहेत हे सन 2000 रोजी केंद्रीय राखीव पोलिस बल (CRPF) मध्ये भरती झाले. जम्मू काश्मीर मध्ये त्यांची ट्रेनिंग पूर्ण झाली. त्यानंतर त्यांची पोस्टिंग आसाम मध्ये करण्यात आली. त्यांनी आसाम, लेह लद्दाख, दिल्ली, व ओडिशा छत्तीसगड सारख्या नक्षली भागात कार्य केले. आणि 25 वर्ष देश सेवा करून ते ऑक्टोंबर 2025 मध्ये सेवानिवृत्त झाले.
सेवापूर्ती निमित्त त्यांचे अमळनेर येथे नागरिक व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. देशसेवेतील त्यांच्या योगदानाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आदिवासी क्रांती सेनेचे तालुका अध्यक्ष संजय पारधी ,धनराज पारधी, बुरा पारधी यांनी सत्कार केला आणि या कार्यक्रमाला समाज बांधव उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा