Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
दि शिरपूर मर्चंट्स को-ऑप बँक लिमिटेडचे तत्कालीन अध्यक्ष,व्यवस्थापक, कर्ज वितरण अधिकारी आणि आणखी एका कर्मचाऱ्याचा अटकपूर्व जामीन अर्ज धुळे विशेष न्यायालयाने फेटाळला! भागधारक सदस्य आणि ठेवीदारांनी आनंद व्यक्त केला!
दि शिरपूर मर्चंट्स को-ऑप बँक लिमिटेडचे तत्कालीन अध्यक्ष,व्यवस्थापक, कर्ज वितरण अधिकारी आणि आणखी एका कर्मचाऱ्याचा अटकपूर्व जामीन अर्ज धुळे विशेष न्यायालयाने फेटाळला! भागधारक सदस्य आणि ठेवीदारांनी आनंद व्यक्त केला!
शिरपूर (प्रतिनिधी) धुळे येथील विशेष सत्र न्यायालयाने सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी तत्कालीन (माजी) अध्यक्ष प्रसन्न जयराज जैन, व्यवस्थापक संजय केशव कुलकर्णी, कर्ज वितरण अधिकारी महेश उर्फ गोपाळ पंडितलाल गुजराथी आणि आणखी एक कर्मचारी डी.बी.कापडी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. हे चौघे एकेकाळी प्रसिद्ध सहकारी बँक, द शिरपूर मर्चंट्स को-ऑप बँक लिमिटेडच्या अधो गतीला जबाबदार आहेत असे अभि योजन पक्षाने कोर्टात पुराव्यानिशी मांडले होते. उल्लेखनीय आहे कि,दि शिरपूर मर्चंट्स को-ऑप बँकेत सुमारे १४ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार (गैरव्यवहार) आणि एमपीआयडी (ठेवीदार सुरक्षा) कायद्यान्वये दाखल झालेल्या एफआयआर ही अनेक फौजदारी कलमांखाली साडेतीन महिन्यांहून अधिक काळापासून दाखल होऊन जवळ पास साडेतीन महिने उलटूनही एकाही आरोपीला अटक का करण्यात आली नाही, याचे स्पष्टीकरण देण्यासाठी तपास अधि काऱ्यांना कोर्टाने विचारणा केली आणि न्यायालयाने तपास अधिकारी यांच्यावर काही ताशेरे सुध्दा ओढले. विद्वान न्याया धीश श्री तापकीरे यांनी विशेष सत्र न्याया लयात केले. या प्रकरणातील आरोपींचे प्रतिनिधित्व अॅड. निखिल एस. सोनवणे, अॅड. वाघमारे, अॅड. किशोर एम. सोनवणे, अॅड. अमित जे. जैन इत्यादींनी केले. तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील डीजीपी अॅड. देवेंद्रसिंह तंवर आणि त्यांचे सहकारी अभियोक्ता अॅड.मयूर बैसाणे व बँकेतर्फे अॅड. नितिन चोरड़िया व त्यांच्या सहका ऱ्यांनी उपलब्ध पुराव्यांचे जोरदार समर्थन केले.
यावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आणि प्रत्यक्ष सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे शिरपुर मर्चंटस् बँकेचे तत्कालीन चेअरमन प्रसन्ना जयराज जैन,व्यवस्थापक संजय केशव कुलकर्णी, तत्कालीन ऋण वितरण अधिकारी महेश उर्फ गोपाल पंडितलाल गुजराथी आणि एक अन्य कर्मचारी डी.बी. कापडी या चारही आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज सोमवार दि 29 सप्टेंबर 2025 रोजी फेटाळण्यात आले. न्यायाधीश श्री तापकीरे यांनी आरोपींना पकडण्यासाठी आतापर्यंत तपास अधिका-यांच्या संथ कारवाईवर नाराजी व्यक्त केली. आता अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेल्या सर्व आरोपींना औरंगाबाद (संभाजीनगर) उच्च न्यायालयात अपील करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. परंतु न्यायालयाच्या टिप्पण्या पाहता, तपास अधिकारी शिरपुरचे उप विभागीय पोलिस अधिकारी श्री गोसावी यांची टीम, या दरम्यान या चौघांना अटक करेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आता बँकेचे सर्व भागधारक, सदस्य आणि ठेवीदार, तसेच जिल्ह्यातील सहकारी क्षेत्राचे याकडे बारकाईने लक्ष आहे. सन २०२१ पासून आजपर्यंत "बँक बचाव समिती" च्या सतत पाठपुराव्यामुळे आणि अथक प्रयत्नां मुळे तसेच सध्याच्या प्रशासकांच्या प्रयत्नां मुळे या आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झाला नाही म्हणून या बँकेच्या भागधारकांनी आणि ठेवीदारांनी त्यांचे आभार मानले आहेत आणि आनंद व्यक्त केला आहे. "शिरपूर मर्चंट्स को-ऑप बँक बचाव समिती" चा संघर्ष सर्व सदस्यांना आणि ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळेपर्यंत सुरूच राहील, अशी माहिती "बँक बचाव समिती" शिरपूर जिल्हा धुळे यांनीही मिडीया ला दिली. आतापर्यंत एफआयआर नोंद लेल्या एकूण ४८ आरोपींपैकी काही कर्जदारांना कर्जाची रक्कम त्वरित भरण्या च्या अटीवर सशर्त जामीन देण्यात आला आहे, तर उर्वरित काही कर्जदारांच्या प्रक रणाचा निर्णय न्यायालयात लवकरच होण्याची शक्यता आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा