Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०२५

साक्री तालुक्याची अस्मिता असलेला पांझरा कांन सहकारी साखर कारखाना अखेर 25 वर्षानंतर पुन्हा सुरू होणार शालेय शिक्षण राज्य मंत्री दादाजी भुसे यांची ग्वाही.



साक्री प्रतिनिधी / साक्री पांझरा कान साखर सह. कारखान्याच्या आवारात भव्य असा शेतकरी मेळावा घेण्यात आला या यावेळी शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले या मेळाव्यात हजारो शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली त्यात ज्येष्ठ नागरिक महिला तरुण तसेच कारखान्याचे माजी कर्मचारी आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते या शेतकरी मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे व भाजपचे धुळे जिल्हा पालकमंत्री तसेच पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल सोबतच तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार मंजुळा गावित त्यांचे पती शिवसेनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष तुळशीराम गावित,पांझरा कान साखर कारखाना सुरु करणारे युगपुरुष श्री सोपानराव गायकवाड साहेब तसेच भाडणे गावाचे लोकनियुक्त सरपंच तरुणांच्या गळ्यातले ताईत साई भक्त अजय भाऊ सोनवणे व साक्री तालुक्याचे सर्वपक्षीय नेते गण या मेळाव्यासाठी उपस्थित होते.

यावेळी गायकवाड यांनी साक्री तालुका वासियांना सांगितले की सन.ऑगस्ट 2026 ला आपण कारखान्यातुन साखर बाहेर काढणार आहोत यात कुठलीही शंका नाही. पांझरा कान सह साखर कारखाना चालू करणे हे माझं मुख्य उद्दिष्ट आहे आणि सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणं हा माझा मानस आहे असा गायकवाड यांनी तालुका वासियांना विश्वास दिला.यावेळी बोलताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील साक्री तालुका वासियांना अधोरेखित केले की या कारखान्यासाठी चालू होण्यासाठी जी काही अडचण प्रशासकीय स्तरावरील ती करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.किंबहुना करितो आहे म्हणुन साक्री करांना सांगू इच्छितो की पांझरा कान साखर कारखाना चालू होण्यापासून आता कुणीही थांबू शकत नाही यावेळी मी साक्री तालुका वासियांना दिवाळी गिफ्ट म्हणून साखर कारखाना सुरु करून देणार हा शब्द देतो.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध