Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ११ ऑक्टोबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
जळोद आश्रमशाळेत मोठा घोटाळा दोन कोटींच्या गैरकारभारावर ग्रामस्थ संतप्त; आदिवासी विकास प्रकल्प' कार्यालयाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह !! पोलिसांची संशयास्पद भूमिका
जळोद आश्रमशाळेत मोठा घोटाळा दोन कोटींच्या गैरकारभारावर ग्रामस्थ संतप्त; आदिवासी विकास प्रकल्प' कार्यालयाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह !! पोलिसांची संशयास्पद भूमिका
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील जळोद येथील अनुदानित आश्रमशाळेत कोट्यवधी रुपयांच्या इमारतभाड्याचा गैरकारभार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. खोटे आणि बनावट कागदपत्रे वापरून तब्बल दोन कोटी १७ लाख ५६ हजार रुपयांहून अधिक इमारत भाडे बेकायदेशीरपणे लाटण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन केले.
नेमका घोटाळा काय ?
खान्देश कन्या स्व. सिमा पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी शिरपूर संचलित जळोद येथील आश्रमशाळेत हा गैरकारभार झाला आहे. संस्थेच्या तत्कालीन संचालक मंडळाने १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ या चार वर्षांच्या कालावधीत दोन कोटी १७ लाख ५६ हजार रुपयांपेक्षा जास्त इमारत भाडे नियमबाह्य पद्धतीने काढून घेतले.
बनावट कागदपत्रे आणि शाळा स्थलांतर
इमारत भाड्याच्या गैरव्यवहारासोबतच, अशोक आधार पाटील आणि योगिता पाटील यांनी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष सुभाषसिंह जमादार यांची खोटी सही आणि बनावट कारणे देऊन बेकायदेशीरपणे शाळा स्थलांतरित केल्याचीही गंभीर तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. या सर्व गैरप्रकारांवर कायदेशीर कारवाई करून त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
प्रशासन व पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न
हा गैरव्यवहार उघड होऊनही, ६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन देऊनही आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून कारवाईसाठी सातत्याने दिरंगाई केली जात आहे. यामुळे, "आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील काही अधिकारी या संपूर्ण भ्रष्ट्राचारात सहभागी आहेत," असा थेट आणि गंभीर संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
इतकेच नव्हे, तर कोट्यवधींच्या गैरकारभारात गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेत होणारी दिरंगाई पाहता, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद दिसून येत आहे, असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
अशोक आधार पाटील यांच्यासह संचालक मंडळातील संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अन्यथा या संपूर्ण भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या सर्व संशयितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा खणखणीत इशारा आंदोलक ग्रामस्थांनी दिला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा