Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ११ ऑक्टोबर, २०२५

“सरन्यायाधीशांवर हल्ला म्हणजे संविधानावरच प्रहार!” — शिरपूरमध्ये बौद्ध-आंबेडकरी समाजाचा तीव्र निषेध



शिरपूर प्रतिनिधी /समस्त शिरपूर तालुक्यातील बौद्ध-आंबेडकरी तसेच शिव-शाहू-फुले-आंबेडकरी चळवळीच्या वतीने मा.नगरसेवक गणेशभाऊ सावळे,मा नगरसेवक पिंटूभाऊ शिरसाट,मा.नगरसेवक बाबुदादा खैरनार, प्रा.शैलेंद्र सोनवणे,अशोक ढिवरे, सुनील बैसाणे, गोविंदा थोरात,ॲड. शालिनी सोनवणे, मुकुंद बैसाणे, बापू इंदासे, दत्ता थोरात, रमेश वानखेडे, राजेंद्र रणदिवे, विजयानंद शिरसाट,मूलचंद शिरसाट, यांच्यासह असंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात काही दिवसांपूर्वी घडलेली घटना ही आधुनिक भारताच्या विवेकावर उमटलेला काळा डाग ठरावी अशी आहे.

सरन्यायाधीश मा.भुषण गवई यांच्या दिशेने एका धर्मांध वकिलाने जोडा भिरकावण्याचा प्रयत्न केला-हा क्षण केवळ एका व्यक्तीच्या सन्मानावर नव्हे, तर न्याय, तर्कसंगतता आणि समतेच्या आदर्शांवरच झालेला वज्राघात होता.ही घटना एका वैयक्तिक अपमानापलीकडे जाते. ती त्या विचारपरंपरेवर प्रहार करते, जी शतकानुशतके समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे.

प्रतिगाम्यांच्या मनुवादी वर्चस्वाला आव्हान देत तर्क, विज्ञान, समता आणि न्यायासाठी लढणाऱ्या आंबेडकरी चळवळीचा हा थेट अपमान आहे. या अपमानाचे प्रतिध्वनी केवळ न्यायपीठातच नव्हे, तर प्रत्येक संवेदनशील मनात उमटले आहेत.शिरपूर तहसील कार्यालयात समस्त बौद्ध-आंबेडकरी तसेच शिव-शाहू-फुले-आंबेडकरी चळवळीच्या वतीने सादर केलेल्या निवेदनात याच भावनेचा सूर उमटला - हा हल्ला करण्याचा प्रयत्न केवळ न्यायाधीशांवर झालेला नसून, हा थेट घटनात्मक मूल्यांवरच हल्ला आहे.

प्रा.कॉ.शैलेंद्र सोनवणे आणि सुनील बैसाणे यांनी आपल्या विधानात नमूद केले की, दलितांविरुद्धच्या अत्याचारांच्या घटना आजही थांबत नाहीत, शोषित वंचितांची आर्थिक प्रगती झाली तरी जातीय अवहेलनांचे विष अद्याप संपलेले नाही. दलित व्यक्ती जशी उच्च पदावर जाते, तसा तिच्याविषयीचा द्वेष अधिक धारदार होत जातो- जणू समानतेची उंची अनेकांना असह्य ठरते आहे.ही घटना एक जाणीव करून देते की-समतेचा लढा अजून संपलेला नाही.न्यायाच्या सर्वोच्च पदावर सरन्यायाधीश मा.भुषण गवई आज संविधानाचे रक्षणकर्ते आहेत, आणि त्याच्यावरील प्रहार म्हणजे भारतीय संविधानिक लोकशाहीच्या अंतःकरणावर झालेला प्रहार आहे. या काळात पुन्हा एकदा तर्क, विवेक, बंधुता आणि समतेच्या ध्वजाखाली उभे राहण्याची वेळ आली आहे.

असे मत यावेळी निवेदनकर्त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी बन्सीलाल शिरसाट, लोटन थोरात, दिनेश सावळे, राकेश थोरात, प्रमोद शिरसाट, नागसेन पानपाटील,भारत थोरात, महेंद्र कढरे,रोशन थोरात,आकाश बाविस्कर, सागर खैरनार, बाबाजी करनकाळ, दीपक अहिरे, रवींद्र थोरात, विशाल थोरात, अशोक शिरसाट, प्रवीण पानपाटील, मायकल ठाकरे, मधुकर थोरात, रमेश थोरात, सिद्धार्थ वाघ, नागो अहिरे, राजू सूर्यवंशी, पंकज थोरात, अजय खेरनार, अमित ठाकरे, आनंदा भिल, यश साने, राहुल मोरे, सुबोध गवळे आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध