Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १५ ऑक्टोबर, २०२५

माजी आमदार शिरीष चौधरी यांचा शिवसेनेत प्रवेश


अमळनेर (प्रतिनिधी):-
अमळनेर

अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 14 रोजी मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, पारोळ्याचे आमदार अमोल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या पक्षप्रवेशामुळे तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढण्यात येणार आहें. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक प्रवीण पाठक, गुलाब पाटील, पंकज चौधरी, भाऊसाहेब महाजन, चंद्रकांत कंखरे, यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. येणाऱ्या काळात अमळनेर येथील मेळाव्यात अनेकांचा प्रवेश होणार असल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध