Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५

लोहारा येथे आदी कर्मयोगी अभियान अंतर्गत व्हिलेज प्रोसेस लॅब व गावं शिवार फेरी चे आयोजन...



रावेर प्रतिनीधी:- तालुक्यातील लोहारा  ग्रामपंचायत आदी सेवा केंद्र येथे लोक सहभागातून उमेद च्या हिना वारली आर्टस् अँड गॅलरी ,आशियाना महिला बचत गटाच्या माध्यमातून आदिवासी भित्त चित्रकला तडवी भिल भित्त चित्रकला व वारली चित्रकला साकारण्यात आली व आदी सेवा केंद्र चे उद्घाटन म.सरपंच अंजुम जमादार श्री अरुण पवार, प्रकल्प अधिकारी ,आदिवासी प्रकल्प यावल,श्री.विनोद मेढे, गटविकास अधिकारी,रावेर,सहा.प्रकल्प अधिकारी श्री प्रशांत माहुरे सर,जिल्हा मास्टर ट्रेनर श्री अजित जमादार शा.अभियंता व  तालुका मास्टर, ग्राम पंचायत अधिकारी राजेंद्र तडवी, लियाकत जमादार ग्रामपंचायत सदस्य व सर्वआदी साथी,आदी सहयोगी यांच्या उपास्थित करण्यात आले.गावं शिवार फेरी काढून पुढील 5 वर्षाचा विकास आराखडा तयार करण्यात आला ..धरती आबा ग्राम उन्नत अभियान अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर ,भारत सरकार तर्फे मंजुरी देण्यात येणार आहे. त्यामुळे आदी कर्मयोगी अभियानातून आदिवासी गावांचा चेहरा मोहरा बदलणार आहे.. आदिवासी भागातील   कलाकारांना तसेच बचत गट उत्पादीत महिलांना त्यांना त्याचे हक्काचे कला भवन छोट्याश्या गावात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या लोहारा गावांत तयार होईल..याचा आनंद गावातील कलाकार व बचत गट महिलांनी मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर ,भारत सरकार व आदिवासी विकास विभाग ,महाराष्ट्र शासन यांचे आभार मानले..या पूर्वी आम्हला शासन स्तरावरून आमच्या गरजा पूर्ण करणे करिता आदी कर्मयोगी अभियान राबविले याचा आनंद व्यक्त करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध