Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
एच.आर.पटेल महिला महाविद्यालयाच्या रासेयो एककाने गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती निमित्त राबविले स्वच्छता अभियान
एच.आर.पटेल महिला महाविद्यालयाच्या रासेयो एककाने गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती निमित्त राबविले स्वच्छता अभियान
शिरपूर प्रतिनिधी / येथील,एच.आर.पटेल कला महिला महाविद्यालयाच्या रासेयो एककातर्फे महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त स्वच्छता जनजागृती फेरी व शासकीय जिल्हा रुग्णालय, शिरपूर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या निमित्त,महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ शारदा शितोळे यांनी या स्वच्छता फेरीत सहभाग नोंदवून स्वयंसेवक विद्यार्थीनींना प्रोत्साहन दिले.डॉ शितोळे यांनी महात्मा गांधी यांच्या स्वच्छ भारत या संकल्पनेची रासेयो स्वयंसेवक विद्यार्थीनींशी सखोल चर्चा केली.
या प्रसंगी,महिला माहाविद्यालयाच्या रासेयो एककातील एकूण 122 स्वयंसेवक विद्यार्थीनींनी मिळून शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील केर-कचरा साफ केला. त्यांनी रुग्णालय आवारातील गवत, प्लास्टीक, कागद, रुग्णालयातील टाकाऊ माल जमा करून संपूर्ण परिसरात झाडू मारला.
या अभियानाचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.एम.वाडिले,रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.मनिषा चौधरी व रासेयो सहायक कार्यक्रम अधिकारी श्री भास्कर खैरनार यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा