Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
बेटावद येथील मोठ्या बालाजी रथोत्सवात पालकमंत्री जयकुमार रावल यांचा तोला नवस पूर्ण
बेटावद येथील मोठ्या बालाजी रथोत्सवात पालकमंत्री जयकुमार रावल यांचा तोला नवस पूर्ण
बेटावद गावाची शान आणि श्रद्धास्थान
असलेल्या मोठ्या बालाजी संस्थानचा 328 वर्षांची परंपरा लाभलेला रथोत्सव आज भक्तीमय वातावरणात पार पडला. यावर्षीच्या या रथोत्सवात जिल्ह्याचे पालक मंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री श्री. जयकुमार भाऊ रावल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते मोठ्या बालाजी महाराजांच्या रथाचे पूजन करण्यात आले.
यावेळी गावातील खंदे कार्यकर्तमहेंद्र माळी), परेश जैन जितेंद्र पवार यांनी जयकुमार भाऊंची मंत्रीपदी वर्णी व्हावी, या भावनेने रथाला "तोला" चा नवस मानला होता. हा नवस पूर्ण करताना मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या वजना एवढ्या केळींचा तोला अर्पण करून हा अनोखा सोहळा पार पडला. कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार हा नवस पूर्ण झाल्याने उपस्थित भाविकांनी "गोविंदा गोविंदा व्यंकट रमना गोविंदा"च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून टाकले.
रथ ओढण्याचा शुभारंभ होताच गावात भक्ती, उत्साह आणि परंपरेचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळाले. यावेळी मोठे बालाजी संस्थान चे अध्यक्ष प्रकाश दामू माळी, सरपंच मंगलचंद जैन यांच्यासह नथा आबा वारुळे, महेश पाटील (कामगार मोर्चा सरचिटणीस), पंकज कदम (मा. जि. प. सदस्य), प्रवीण मोरे (मा. प. स. सदस्य), वीरेंद्र पवार, राजेंद्र कोळी, संजीवनी ताई सिसोदे (मा. जि. प. सदस्य) व अनेक मान्यवर उपस्थित होते.
रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातील रथमार्गावर विवध दुकानें सजली आहेत आजूबाजूच्या खेड्यांमधून तसेच दूरवरून आलेल्या हजारो भाविकांनी या पारंपरिक रथयात्रेत उत्साहाने सहभाग घेतला.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नरडाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथक, होमगार्ड पथक तसेच नरडाणा व बेटावद पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिवसभर कार्यरत होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा