Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५

घरकुलाच्या पैशावरून महिला सरपंच व तिघांना मारहाण

अमळनेर(प्रतिनिधी) घरकुलाच्या पैशावरून महिला सरपंच व तिघांना मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना तालुक्यातील सारबेटे बु.येथे घडली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अधिक माहिती अशी की, दिनांक २ रोजी सायंकाळी सदर महिला सरपंच घरी असता गावात राहणारे सरफराज खा शफीक खा, मोहसीन खा शफीक खा, फिरोज खा शफीक खा, मोईन खा शफीक खा हे चौघे अंगणात येऊन शिवीगाळ करू लागले. त्यावेळी महिला सरपंचाने विचारणा केली असता चौघांनी सांगितले की, तू आमचे घरकुलाचे पैसे का टाकत नाही, त्यावेळी महिला सरपंचाने सदर पैसे मी टाकत नसून बिडीओ आणि इंजिनिअर टाकत असल्याचे सांगितले. 

मात्र महिला सरपंचाच्या बोलण्याचा त्यांना राग आल्याने चौघांनी तिला पुन्हा शिवीगाळ करत चापट बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. सदर महिलेला वाचवण्यासाठी आलेले भाऊ व भाचा यांना लोखंडी रॉड, वीट व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले. त्यावेळी गावातील लोकांनी येऊन भांडण सोडवले.महिलेचे दोन्ही भाऊ व भाचा जास्त जखमी झाल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सदर महिलेच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय रामकृष्ण कुमावत हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध