Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५

विवाह बंध रेशमाचे की व्यवहार


           
विवाह म्हणजे एक अद्भुत भावनांचा स्पर्श. दोन व्यक्ती, दोन तन मनं, आणि दोन परिवार जसे एकत्र होतात, मनाने जुळून येतात तेव्हा त्यातून एक नवीन नात्याची पालवी फुटते. या नात्याला आपण “रेशीमगाठ” म्हणतो. हल्लीच्या काळात खुपदा प्रश्न विचारला जातो, विवाह बंध रेशमाचे की तो फक्त एक व्यवहार आहे? सर्वत्र गाडी, बंगला ,मोठी नोकरी व पैसा पाहिजे याचं भूत जरा जास्तच आहे !! या मधे समाजाची भूमिका खूप महत्वाची असावी यात शंका नाही.

                 
विवाहाच नातं दोन व्यक्ती, दोन कुटुंबं, दोन जीवनं प्रेम आणि सहजीवनाच्या विश्वासाच्या धाग्यांनी बांधली जातात. त्यात त्याग आणि समजूतदारपणा एकमेकांप्रती समर्पण, आनंद-दुःखात सहभाग महत्त्वाचाच. जीवनात व्यवहारिक गोष्टीही येतात आर्थिक जबाबदाऱ्या, कुटुंबातील भूमिका, निर्णय घेणं, दैनंदिन जीवनाचं व्यवस्थापन इत्यादी. त्यामुळे विवाह हा फक्त भावना नसून एक व्यवहारिक समजूतदारपणाचा करार सुद्धा असतो. विवाह म्हणजे रेशीमगाठ आणि व्यवहार दोन्हीचं सुंदर मिश्रण .तर तो एक पवित्र बंध जिथे आत्मा आणि मन दोन्ही एकच असतात.

                
बंध रेशमाचे अर्थात रेशीमगाठ, जर खरंच मनाचे बंध जुळलेले असतील तर गाठ सैल असली तरी तुटत नाही. मग त्या रेशीमगाठी लग्नाआधीच्या ओळखीतून प्रेमातून निर्माण झाल्या असोत किंवा व्यवस्थित चहा कांदेपोहे खाऊन जोडलेल्या. हल्ली परंपरेने रेशीमगाठी खुपदा चुकीच्या पद्धतीने इतक्या दाबून आवळलेल्या असतात की त्यात दोघांपैकी एकाचा किंवा काहीवेळा दोघांचाही आणि कधी कधी त्या पूर्ण कुटुंबाचा बळी जातो हे वास्तव !! उदा हुंडाबळी,नको तो आहेर.म्हणून व्यवहार स्थैर्यतेचा तडजोडीचा व्हावा, पैसा अथवा अविश्वासाचा नव्हे.
             
जीवन फक्त भावनांचा रस्ता नाही, वास्तवात आर्थिक जबाबदाऱ्या, रोजचे जीवनातील निर्णय, नातेवाईकांचे संबंध, बाळांचे संगोपन या सगळ्या गोष्टींमध्ये व्यवहार येतोच. आजच्या डिजीटल स्पर्धात्मक युगात विवाहातील व्यवहारिकता नाकारता येत नाही. पण विवाह समजदारी तडजोड याच समृद्ध संतुलन आहे. फक्त भावना असेल तर जीवन विस्कळीत होतं, आणि फक्त व्यवहार असेल तर नातं नीरस होतं. प्रेम आणि समजूतदारपणाची जोड असली तर व्यवहारिक विचारांसोबत विवाह सुखदायी आनंददायी होतो.
           
लग्न सामाजिक प्रघात नाही, तर दोन जीवांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा संस्कार आहे. दोन मनं, दोन विचार आणि दोन कुटुंबं जेव्हा एका बंधनात गुंफली जातात, तेव्हा या नात्याला “रेशीमबंध” अस म्हणतात. या रेशीमगाठीचं सौंदर्य तिच्या नाजूक पण टिकाऊ स्वरूपात आहे.एक जीवनसंगीत, प्रेम, आदर, जबाबदारी आणि विश्वास सामाजिक व्यवहार एकत्र येतात. हाच समतोल राखणं हेच यशस्वी विवाहाचं खरं गमक रहस्य. मात्र पालकांचे व्यवहार अती हस्तक्षेप होणे, अती लाडाने बंध रेशमाला वेगळे फाटे फुटतात.
               
आजच्या जीवनात वास्तविक आर्थिक जबाबदाऱ्या, कुटुंबातील भूमिका, निर्णय घेणं आणि सामाजिक अपेक्षा या सर्व गोष्टी विवाहाला एक व्यवहारिक स्वरूप देतात. त्या असतील तर उत्तमच मात्र लग्ना पूर्वीच सर्व सोयी होणे, भविष्यातील सर्व प्लान अधोरेखित करणे जबाबदारीवर ओझ टाकतात. म्हणून लग्न व जबाबदारीचा व्यवहार दोन्हींचं संतुलित मिश्रण आहे. भावना नसेल तर नातं कोरडं व व्यवहार नसेल तर जीवन विस्कळीत होतं. प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा या भावनिक जबाबदारीसह संयम आणि वास्तवदृष्टी हे प्रगतीशील व्यवहारिक घटक महत्वाचे.
               
सामाजिक प्रवासात वावरत असतांना आलेल्या अनुभवातून शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न. 

"सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया"

विवाह अर्थात दोघांचं स्वप्न, भावनांच एकत्रीकरण,प्रेम विश्वासाबरोबर त्याग समजस्य वृत्तीने मानवी मनाने जुळवून घेणे तरच आयुष्य सुखकारक होऊन नात्याच नवं सौंदर्य फुलेल.

                         शब्दांकन 
             दिपक सुमन पंडित साटोटे
भोईसमाज जिल्हा युवा संघटक, नंदुरबार



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध