Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५

रावेर तालुक्यात कचरा विलगिकरण केंद्र ठरताहेत शोभेच्या वस्तू..


रावेर प्रतिनिधी:- भिमराव कोचुरे

रावेर तालुक्यातील बहुतांश ग्राम पंचायत ने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024/2025 मध्ये कचरा विलगिकरण केंद्र बांधण्यात आले आहे.परंतु या केंद्र मध्ये ना सुका कचरा व ओला कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नाही.शासन   स्वच्छ भारत मिशन योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करते पण कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली जात नाही.तसेच ग्राम पंचायत स्तरावर उपलब्ध असलेल्या कचरा विलगिकरण केंद्राचा उपयोग तरी काय? रावेर तालुक्यातील बहुतांश गावात तसेच रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग नेहमीच निदर्शनास येत असतात.तसेच अस्तव्यस्त पडलेला कचरा नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे .तसेच शोपीस ठरत असलेले कचरा विलगीकरण केंद्राकडे प्रशासनाने  लक्ष देवून सुका व ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करावा अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध