Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५
शिंदखेडा राजकारणात भूचाल – विरोधी गटाचा भाजपात प्रवेश..!
शिंदखेडा प्रतिनिधी - नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर शिंदखेडा मतदारसंघात मोठा भुचाल आला असून जे दरवेळी भाजपच्या पॅनल च्य्या विरोधात पॅनल उभे करायचे त्यांनीच भाजपात प्रवेश केल्यामुळे आता विरोधी पक्षाकडून पॅनल कोण उभे करेल याचीच चर्चा रंगू लागली आहे. आज मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शिंदखेडा शहरातील माजी नगराध्यक्ष दीपक देसले, माजी नगराध्यक्षा बानुबाई भील, कांग्रेस शहराध्यक्ष दिनेश माळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप)शहराध्यक्ष प्रवीण पाटील , उबाठा सेनेचे तालुका समन्वयक विनायक पवार, माजी नगरसेवक संगीता थोरात, निंबाजी सोनवणे यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे विरोधकांची हवा पूर्ण गुल झाल्यागत स्थिती निर्माण झाली आहे.
आज पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शिंदखेडा येथील गांधी चौकात प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी गटनेते अनिल वानखेडे, माजी नगराध्यक्षा रजनी वानखेडे, मनोहर पाटील, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, भाजप शहराध्यक्ष संजय महाजन, प्रकाश देसले, माजी सभापती जिजाबराव सोनवणे, माजी जि प सदस्य पंकज कदम, महावीरसिंह रावल, देविदास बोरसे, उपसभापती प्रा. आर जी खैरनार, किशोर रंगराव पाटील यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिंदखेडा येथील माजी नगराध्यक्ष दिपक सुधाकर देसले, दीपलक्ष्मी पतसंस्था चेअरमन प्रेरणा दीपक देसले, काँग्रेस शहराध्यक्ष दिनेश आत्माराम माळी, नगरसेवक संगीता किरण थोरात, राष्ट्रवादी श.प. गट शहराध्यक्ष प्रवीण विनायक पवार, शिवसेना तालुका समन्वयक विनायक अभिमान पवार, राज्यकार्यकारी सदस्य लीगल सेल राष्ट्रीय काँग्रेस पार्टी एड. निलेश एकनाथ देसले, निवृत्त नायब तहसीलदार गोटू आप्पा महाले, संचालक विकास सोसायटी सचिन चंद्रकांत देसले, संचालक विकास सोसायटी दिपक आधार भामरे, माजी प्रथम नगराध्यक्ष बानुबाई नामदेव भिल, मराठा समाज नवयुवक मंडळ अध्यक्ष भूषण दिलीप मराठे, सामाजिक कार्यकर्ता छोटू दौलत ठाकूर, आनंद बाजीराव देसले, शामराव काशिनाथ भदाने, रमेश नामदेव भील, संचालक सुनील लोटन बडगुजर, मुस्लिम समाज बांधव माजी सरपंच निमान दादा पठाण, सामाजिक कार्यकर्ता जहागीर शेख हैदर, साबीर शेख कमान, शकील अब्दुल बागवान, परवेज बागवान, वसीम मुकुद खाटीक, जुनेद शेख समद, नदीम शेख युनूस बागवान, मंजमिल जमेल पठाण, अझर सईद मिर्झा, सामाजिक कार्यकर्ता माजी नगरसेवक निंबाजी अवचित सोनवणे, प्रभाकर जयराम मराठे, जितेंद्र गुरव, मिलिंद एकनाथ देसले, वैभव जिजाबराव देसले, प्रसाद गणेशराव विंचुरकर, रवींद्र बाबुराव देसले, प्रकाश बाबुराव देसले. जितेंद्र दयाराम मोरे, करण रामचंद्र गोधवानी, दिनेश रवींद्र ठाकूर, अर्जुन रामचंद्र गोधवानी, शाहिद युसुफ पिंजारी, चेतन बडगुजर, योगेश मराठे, विक्की बडगुजर, शिवसेना शिंदे गट सतीश भास्कर सूर्यवंशी, भटक्या विमुक्त जाती शहर अध्यक्ष कृष्णा बाबू. आदींनी प्रवेश केला.
माजी पं.स.सदस्य विशाल पवार यांच्यासह समर्थकांचा भाजपत प्रवेश
पाटण येथील माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य प्राध्यापक डॉक्टर विशाल पवार सर, लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत सौ अर्चना विशाल पवार, परदेशी समाज पंचमंडळ अध्यक्ष फौजी कैलास भटु परदेशी, माजी उपसरपंच भागवत मगन परदेशी व ज्योत्स्ना मनोहर सावंत, विकास सोसायटी व्हा चेअरमन रामकृष्ण सीताराम पवार, ग्रामपंचायत सदस्य भाईदास आसाराम मोरे, दगुबाई सुकलाल सोनवणे, कमलाबाई सुक्राम मोरे,एकनाथ नाटो कोळी चंद्रकांत पांडुरंग माळी दीपक सदाशिव पवार बटू खंडू पवार आम्ही राधा परदेशी धर्मेंद्र पुंडलिक पवार दादाभाई रोहिदास बोरसे गणेश भागवत को परदेशी सिताराम गुलाब सोनवणे आदींनी भाजपत प्रवेश केला.
"खलाने येथील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश"
खलाने येथील आनंद बाबुराव देसले, महेंद्र सुरेश देसले, प्रवीण पंडित देसले, लक्ष्मण आनंदा भदाणे, किशोर तुकाराम भील, भटू भावराव न्हावी, हीसपूर माजी सरपंच हंसराज नथू पाटील आदींनी भाजपात प्रवेश केला.
"वरुळ येथील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश"
वरुळ येथील माजी सरपंच राकेश राजपूत, सरपंच राजेंद्र हिरालाल पाटील, उपसरपंच रणजीत भीमसिंह गिरासे, ज्ञानेश्वर पाटील, प्रमोद पाटील, दिनेश भीला धनगर, संजय पितांबर पाटील, गोविंदा पाटील, प्रकाश पितांबर पाटील, संजय पाटील, पंकज भटू पाटील, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भिल व राजेंद्र पवार, विपुल काशिनाथ पाटील, राहुल मुरलीधर धनगर, विनोद बापू कोळी,, उदयसिंग रतनसिंग गिरासे, भगवान सुरतसिंग गिरासे, आनंद पाटील, भटूसिंग गिरासे, अजय दगा सैंदाणे यांनी मंत्री ना जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी/ शिरपूर-वळवाडे नगरपरिषदेकडून राज्यस्तरीय योजना व इतर शासकीय निधीतून श्रीकृष्ण कॉलनी ते श्रीनगर कॉलनी, मिलिंद नगर परिसरात सि...
-
अमळनेर (प्रतिनिधी) माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केलेल्या शिवराळ वक्तव्याचा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. या वेळी त्यांनी प्रथम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा